आयुष विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सरकारने संवादातून मार्ग काढावा – माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर । झुंझार न्यूज

 

बीएचएमएस, बीएएमएस, बीयुएमएस अशा विविध वैद्यकीय शाखांमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 2021 – 22 नंतर पदवी प्राप्त होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नेक्स्ट आयुष्य राष्ट्रीय पात्रता व परवाना परीक्षा सक्तीची करण्यात आली असून यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी आहे. ही परीक्षा रद्द करावी या मागणी करता संगमनेर मधील विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली याचबरोबर सरकारने आयुष्य विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर संवादातून मार्ग काढावा अशी मागणी काँग्रेसने ते बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केली.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर तालुक्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली यावेळी इथापे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज गुंजाळ होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज रुक्मिणी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अश्विन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज डेरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सिद्धकला आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज या महाविद्यालयांमधील विविध विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये होणारा मनस्ताप व नाराजीचा प्रश्न माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समोर मांडला.

2021 22 नंतर पदवी प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना नेक्स्ट आयुष्य राष्ट्रीय पात्रता व परवाना परीक्षा सक्तीची करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी आणि नियमित आरोग्य सेवा देणारे डॉक्टर यांच्यामध्ये संभ्रम आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. हा प्रश्न होमिओपॅथी किंवा आयुर्वेदिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित आणि महत्त्वाचा असून संगमनेर तालुक्यातील याची सुरुवात झाली असून तालुका जिल्हा व राज्य पातळीवर सर्व विद्यार्थी एकत्रित येऊन सरकारच्या विरोधात आवाज उठवणार आहे.

यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर संवादातून मार्ग काढावा याचबरोबर या प्रश्नासाठी आपण राज्य सरकारमधील आरोग्यमंत्री व विविध खात्यांचे सचिव यांच्याबरोबर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या योग्य मागणीसाठी पाठपुरावा करू असे ते म्हणाले.

यावेळी संगमनेर तालुक्यातील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *