कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू सर्वे अंतर्गत अमृतवाहिनीचा गुणवत्ते मध्ये देशात पहिल्या 10 तर  राज्यात 4 मध्ये

संगमनेर । झुंझार न्यूज 

भारतातील प्रतिष्ठित शैक्षणिक मासिक कॉम्पिटिशन सक्सेसने नुकतीच देशभरातील महाविद्यालयांची गुणवत्ता यादी जाहीर केली असून असलेल्या मा. शिक्षणमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखालील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा उत्कृष्ट गुणवत्तेमुळे देशातील पहिल्या 10 मध्ये तर राज्यांमधून पहिल्या चार मध्ये समावेश असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी आर बाविस्कर यांनी दिली आहे.

महाविद्यालयाच्या यशस्वी कामगिरी बाबत अधिक माहिती देताना प्राचार्य डॉ.पी आर बाविस्कर यांनी सांगितले की, माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात, मा आ. डॉ.सुधीर तांबे व संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये कायम अग्रक्रम राखला आहे. दोन वेळेस उत्कृष्ट महाविद्यालय व दोन वेळेस उत्कृष्ट प्राचार्य हा सन्मान मिळवला आहे. या महाविद्यालयास यूजीसी ने नुकताच स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा प्रदान केला असून अभ्यास निर्मिती, परीक्षा पद्धती, निकाल, प्लेसमेंट या बाबी यशस्वीतेने सुरू आहे. इंडस्ट्रीच्या गरजा नुसार आधुनिक अभ्यासक्रम व डिजिटल शिक्षण प्रणाली आणि संशोधनांना प्रोत्साहन देण्यासह महाविद्यालयाने गुणवत्ता कायम राखली  आहे.  याचबरोबर एनबीएचे पाच वेळा मानांकन मिळवले आहे. अत्यंत प्रतिष्ठेचा असलेला नॅक चा ए प्लस दर्जा मिळवला आहे.

या मासिकाच्या प्रतिनिधींनी सर्वे करताना महाविद्यालयातील अद्यावत कार्यशाळा, हायस्पीड इंटरनेट ,डिजिटल लायब्ररी, आधुनिक प्रयोगशाळा, पायाभूत सुविधा महाविद्यालयातील शिस्तप्रिय व स्वच्छ वातावरण, हिरवाईने नटलेला परिसर, उच्चशिक्षित प्राध्यापक, संशोधनाला वाव आणि विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर विद्यार्थ्यांच्या नोकरीसाठी समन्वय, भव्य क्रीडांगण, अत्याधुनिक सुविधा, या सर्व बाबींचा विचार करून कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू या मासिकाने 2026 मधील गुणवत्तेनुसार अमृतवाहिनी महाविद्यालयाला देशातून पहिल्या 10 मध्ये तर राज्यातून पहिल्या चार मध्ये सन्मान दिला आहे.

महाविद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, मा. आ. डॉ. सुधीर तांबे, कार्यकारी विश्वस्त सौ शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे ,अकॅडमी डायरेक्टर डॉ जे बी गुरव, प्राचार्य डॉ. पी आर बाविस्कर ,रजिस्टर प्रा विजय वाघे यांच्यासह सर्व विभागप्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

गुणवत्तेची परंपरा कायम – सौ.शरयूताई देशमुख

माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात असूनही अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने कायम गुणवत्ता पूर्ण शिक्षण दिले आहे. संशोधनासह आधुनिक शिक्षण प्रणालीचा वापर संस्थेत होत असून विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर असलेल्या समन्वयामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या पॅकेजवर नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या महाविद्यालयाला मागील वर्षापासून स्वायत्त दर्जा मिळाला असून मिळालेली मानांकन हे सामूहिक यश आहे.


सौ शरयूताई देशमुख
कार्यकारी विश्वस्त, अमृतवाहिनी संस्था

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *