मातंग समाजाला विरोध नाही, भाजप सरकारच्या धोरणांना विरोध
शिर्डी । झुंझार न्यूज
अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून राज्यातील सामाजिक वातावरण तापले असतानाच शिर्डीत हजारो भीमसैनिकांचा महामोर्चा काढण्यात आला. उपवर्गीकरणाच्या विरोधात आयोजित या महामोर्चानंतर झालेल्या जाहीर सभेत वक्त्यांनी भाजप सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करत आपला आक्रमक पवित्रा स्पष्ट केला. काही दिवसांपूर्वी शिर्डीत मातंग समाजाच्या वतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चातील काही वक्त्यांनी बौद्ध समाजाबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याचा आरोप आता आंबेडकरी समाजातील आंदोलकांकडून करण्यात येत आहे. या वक्तव्यांमुळे समाजात नाराजी निर्माण झाली असून त्याचे पडसाद शिर्डीतील या महामोर्चात उमटल्याचे चित्र पाहायला मिळाले.
यावेळी वक्त्यांनी स्पष्ट केले की, आमचा विरोध मातंग समाजाला नाही. मातंग समाज हा आमचाच बांधव आहे. मात्र, आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या राजकीय धोरणांना आणि भाजप सरकारच्या भूमिकेला आमचा विरोध आहे. सरकार पुरस्कृत पद्धतीने मातंग समाजाचे मोर्चे काढले जात असल्याचाही आरोप काही वक्त्यांनी केला. आरक्षणाचे उपवर्गीकरण कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असा निर्धार जाहीर सभेत व्यक्त करण्यात आला. तसेच मातंग समाजातील काही वाचाळ वक्त्यांनी बौद्ध समाजाविषयी केलेल्या वक्तव्यांना यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा यावेळी सर्वच वक्त्यांनी दिला .
यावेळी जेष्ठ विचारवंत अँड . सुरेश माने हे आपल्या भाषणात म्हणाले की,२०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हैदराबादला सभा झाली आणि हैदराबादच्या सभेमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की आम्ही सत्तेवरती आलो तर एस सी समाजात उपवर्गीकरण करू. याचा मेन किडा पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या डोक्यात आहे.
१ ऑगस्ट २०२४ ला सुप्रीम कोर्टाचा निकाल आला निकाल गवईंचे यांनी दिला उपवर्गीकरणाला सुप्रीम कोर्टात ब्राह्मण समाजाची महिला बेला त्रिवेदी यांनी विरोध केला गवईं चीफ जस्टिस होते, त्यांनी उपवर्गीकरण करा सांगितलं. ३१ राज्यांमध्ये फक्त ४ राज्यांनी उपवर्गीकरण केलं, ५ वे राज्य अजून नाही. त्यामुळे देशभर उपवर्गीकरण होतंय असं काही नाही. उत्तर प्रदेशमध्ये योगी उपवर्गीकरण करू शकत नाही. २५ राज्यांनी उपवर्गीकरण केलेलं नाही, महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरण करण्याची घाई काय आहे? देवेंद्र फडणवीसांना विचारलं तर त्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही. आपापली वोट बँक तयार करण्यासाठी जातीपातीचं राजकारण भाजपा करत आहे .संघ परिवार म्हणतो आम्ही जाती मानत नाही, भागवत म्हणतात आम्ही जाती मानत नाही, मग बीजेपी जातीचं राजकारण का करते? याचं उत्तर मोहन भागवतांनी द्यावं, याचं उत्तर संघाच्या सरसंघचालकाने द्यावं, पण त्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही. जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि दोन-चार आमच्या मातंग बांधवांना, सगळ्या मातंगांना नाही, सगळा मातंग समाज त्यांच्यासोबत नाही. जेव्हा ३ जूनला पहिल्यांदा मुंबईत मोर्चा झाला, आम्ही मुंबईतल्या सर्व पक्ष संघटनेच्या लोकांनी एकत्र येऊन तो मोर्चा काढला, तेव्हा दुसऱ्या दिवशी विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले लागलं, आम्ही उपवर्गीकरणाचा अजून निर्णय घेतला नाही . महाराष्ट्रात आंबेडकरी लोकांचे मोर्चे सुरू झाले तसे दुसऱ्यांचे मोर्चे सुरू झाले. त्याला किती फंडिंग मिळायला लागलं? रमेश कदम त्यांनी सांगितलं, मातंग समाजाच्या मोर्च्याला अनेक नेत्यांनी करोडो रुपये दिले आणि करोडो रुपये लाटण्यासाठी त्यांनी आंदोलन चालवलं. मुख्य लढा आंबेडकरी चळवळ तोडण्याचं षडयंत्र करणारा बीजेपी असो, आरएसएस वाला असो त्यांच्या विरोधात आहे.क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवेंच्या शिफारशीवरून महाराष्ट्रामधल्या भूमिहीन मातंगांना महाराष्ट्र सरकारनं किती जमीन वाटप केली? एका-दोन आमदारकीसाठी, एका-दोन एमएलसीसाठी सगळ्या समाजाचं वाटोळं करू नका .आमचा लढा हा मातंगाच्या विरोधात नाही, कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नाही, कुठल्या समाजाच्या विरोधात नाही. आमचा लढा देवेंद्र फडणवीस सरकारच्या विरोधात आहे, महाराष्ट्रातल्या बीजेपी सरकारच्या विरोधात आहे.
यावेळी डॉ आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते ॲड . सुरेश माने, बाळासाहेब गायकवाड,जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात , पप्पू बनसोडे, ॲड . अनिल शेजवळ, सोपान जगताप,सिमोन जगताप, नितीन शेजवळ, नाना त्रिभूवन, नितीन धिवर, सचिन गायकवाड, प्रविण आल्हाट, धनंजय निकाळे,दिपकराव गायकवाड, कैलास शेजवळ चांगदेव जगताप,अलकाताई शेजवळ, विमल मोरे, रमादेवी धिवर, स्वप्नील पारडे, विलास शेजवळ, रविंद्र शेजवळ, सचिन बनसोडे, अनिल गायकवाड, गणेश निकाळे, सुनिल शिरसाठ , अशिष शेळके, करण कोळगे, विलास साळवे, संदीप मगर, जितेंद्र रणशूर चर्मकार समाजातील संजय खामकर, बापू ठाकरे, बबलू कांबळे, राजेंद्र भुजबळ , बाबा पंडीत , गुड्यू पंडीत , योगेश मुन्तोडे , नाना कदम , बाळासाहेब कदम , आकाश शेजवळ , अरुण खरात , मोकळ सर , विघे , आदीसह मोठ्या संख्येने भिम सैनिक उपस्थित होते . यावेळी अनेक नेत्यांची भाषणे झाली .