शिर्डी । झुंझार न्यूज

 

सावळी विहीर खुर्द येथे उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामाची भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी डॉ. विखे पाटील यांनी महाविद्यालयाच्या इमारतीचा आराखडा, सुरू असलेल्या बांधकामाची गुणवत्ता, कामाची प्रगती तसेच उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक व पायाभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेतला.

पाहणीदरम्यान त्यांनी कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये, नियोजित वेळेत काम पूर्ण व्हावे आणि भविष्यात विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होतील, या दृष्टीने अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच बांधकामातील काही त्रुटी निदर्शनास आणून देत त्या तातडीने दूर करण्याच्या सूचना संबंधिताना केल्या.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *