{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

आश्वी । झुंजार न्यूज

शिर्डी – पुणे असणारा राज्य महामार्ग क्र 61 अंतर्गत राहाता व्हाया लोहारे, निमगाव (जाळी ),  आश्वी मार्ग पानोडी या 36 किलो मीटर लांबी मध्ये रुंदीकरणास सुरुवात झाली असून हा रस्ता हा दुपदरी होणार आहे.
पुणे – शिर्डी हा प्रवास अत्यंत सुलभ व कमी वेळात होणार असल्याने या रस्त्याला महत्व येणार आहे . या रस्त्याला जोडणाऱ्या गावांचा व्यवसायास व विविध विकासाला चालना मिळणार आहे. हा रस्ता राहाता , साकुरी , दहेगाव , केलवड , निरपुर ,  लोहारे , निमगाव जाळी , आश्वी ,  शिबलापूर मार्गे होणार आहे. 
या कामाचा कालावधी 24 महिने असून, सदर काम कल्याण टोल इंफ्रास्ट्रक्चर प्रा लि, या कंपनी मार्फत योगायत जी जी इन्फ्रा. पुणे ही कंपनी काम करत आहे. रस्त्यालगत असलेल्या गावामध्ये दोन्ही ही बाजूनी भूमिगत गटारीचे नियोजन असून पूर्ण लांबी मध्ये 4 मध्यम पुल, 3 बॉक्स पुल तर 24 मोरी असा 36 किलो मीटरचा मजबूत रस्ता सिमेंट काँक्रीट मध्ये होणार आहे. 
सदर काम हे 24 महिन्यांमध्ये जरी पूर्ण करायचे असले तरी आम्ही कामाचा उच्च दर्जा ठेवून ते 18 महिन्यांमध्ये पूर्ण करू असे मत प्रकल्प व्यवस्थापक,  अमित केसरी प्रधान यांनी सांगितले. 
तर रस्त्यालगत असणारे अतिक्रमण हटवण्यास ग्रामपंचायत व रस्त्यालगत असणाऱ्या शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed