महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांना आ खताळ यांनी धरलले धारेवर

 

महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले निर्देश

 

 

 

संगमनेर । झुंजार न्यूज

 

 

सगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकुर व परिसरातील शेतकर्याना वेळेवर वीज मिळत नाही.आली तर ती थोड्याच वेळ थांबते अन लगेच जाते असा विजेचा लपंडाव सुरू आहे. अशा एकामागे एक महावितरणच्या विरोधात तक्रारींचा पाढा साकुर आणि परिसरातील शेतकर्यांनी आ अमोल खताळ यांच्यासमोर मांडला. त्या नंतर त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत खडे बोल सुनावले. आणि वेळेत आपल्या कामात सुधारणा करा नाहीतर बदली करून घ्या. माझ्या मतदार संघात हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतले जाणार नाही असा इशारा देत येथून पुढे विजेचे रोहित्र जळाले तर ये वर्गणी काढायची नाही तसेच तीन दिवसा मध्ये शेतकऱ्याला विजेचे रोहित्र उपलब्ध करून द्या असे निर्देश आ अमोल खताळ यांनी महावितरण कंपनीच्या अधिका ऱ्यांना दिला

 

 

 

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकुर उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या साकूर मांडवे,कर्जुले पठार (डोळासणे) घारगाव खांबे या महावितरणच्या उपकेंद्रांची आ अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब कुटे, भाजप ज्येष्ठ नेते बाळासाहेब खेमनर, उपाध्यक्ष बुवाजी खेमनर लहानु खेमनर ,भाजप अल्प संख्यांक राज्य कार्यकारणी सदस्य रोफ शेख शिवसेना युवानेते गुलाब भोसले घारगावचे सरपंच नितीन आहेर शिवसेनेचे संदीप खिलारी,राष्ट्रवादी युवती वक्तासेलच्या अध्यक्षा,अमृता कोळ पकर ,प्रियंका जाधव महावितरणच्या संगमनेर उपविभागाचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात अति रिक्त कार्यकारी अभियंता विनायक इंगळे उपकार्यकरी अभियंता प्रेमराज पाटील साकुरचे उपअभियंता राजेश झाघरगावचे उपअभियंता दिपक थोरात यांच्यासह महावितरणचेअधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

 

 

 

या बैठकीमध्ये महावितरणच्या विरोधात शेतकर्यांनी तक्रारी उपस्थित केल्या तसेच अधिकारी फोन सुद्धा उचलत नाही व शेतकऱ्यांशी व्यवस्थित बोलत नाही असे सांगितल्या नंतर आ येथून मागे काय झाले ते सोडून द्या.परंतु आता इथून पुढे कोणीही कामात हलगर्जीपणा केला तर मी खपवून घेणार नाही जर व्यवस्थित काम करायचे नसेल तर बदली करून घ्या असा सज्जड दमही आ अमोल खताळ यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना दिला

 

 

महावितरण कंपनीच ठेकेदार चालवत असल्याचे निदर्शनास येत आहे त्यामुळे आपण या कंपनीमध्ये जी ठेकेदारी चालू आहे ती सर्वप्रथम बंद करा. आणि येथून पुढे महावितरणवर ठेकेदाराचे नव्हे तर अधिकाऱ्यांचे वर्चस्व राहिले पाहिजे .असे ही सक्त निर्देश दिले. शेतकर्याच्या शेतीला पाणी देण्यासाठी नव्हतं इकडून तिकडून पाणी आलं तर आता वीज मिळत नाही. विजेबाबत शेतकऱ्यांनी अधिकारी आणि कर्मचार्यांशी संपर्क साधला तर सौजन्याने वागत नाही.मात्र आता येथून पुढे प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकर्यांशी सौजन्याने बोलत जा .नाही तर आपली बदली करून घ्या अशी तंबी आ अमोल खताळ यांनी महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली

 

 

 

पुढील कालावधीमध्ये जलसंपदामंत्री विखे पाटलांच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे आणि हा पठार भाग सुजलाम सुफलाम करायचा आहे सर्व शेतकऱ्यांना वेळेत वीज कशी मिळेल यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावा तुम्हाला जिथे विजेच्या संदर्भात उपाय योजना करावयाची आहे. या भागातील लोकांना पाणी आले आणि ते पाणी जर उचलता आले नाही .तर त्याच्या सारखं दुर्दैव आमचेच राहील अशी खंत त्यांनी व्यक्त केली .

 

 

 

विजेचे जास्त वेळ ट्रिपिंग जरी झालं तरी आपली यंत्रणा तयार ठेवा अन वेळेत शेतकऱ्यांना वीज कशी देता येईल या साठी प्रयत्न करा माझ्या मतदारसंघांत अधिकार्याना जर कोणी आमचाकार्यकर्ता त्रास देत असेल तर मी अधिकाऱ्यांबरोबर राहील परंतु जर का सर्वसामान्य ग्राहकांना महावितरणचे अधिकारी व कर्मचारी त्रास देत असतील मी शेतकऱ्यांबरोबर आणि वीज ग्राहकांबरोबर राहील असे ही आ खताळ यांनी ठणकावून सांगत ते म्हणाले की १९७२ पासून तालुक्यात जीर्ण झाले ल्या विजेच्या तारा बदलल्या नसल्यामुळे त्या खाली लोंबकळत आहे . याबाबतचा प्रस्ताव माझ्याकडे द्या. आपण ऊर्जा मंत्र्यांना भेटून त्यावर उपाययोजना करू. संगमनेरच्या विकासासाठी इतर मतदार संघांपेक्षा निश्चितच निधी जास्त दिला जाईल असा विश्वास आपल्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यांनी दिला आहे व त्याचा उपयोग आपण हीआपल्या भागातील पाण्याचा विजेचा प्रश्न सोडवि ण्यासाठी प्रयत्नशील राहू असे आखताळ यांनी सांगितले प्रस्ताविक अल्पसंख्यांचे राज्य कार्यकारणी सदस्य रोप शेख यांनी केले तर आभार शिवसेनेचे ऍड अमित धुळगंड यांनी मानले

 

 

 

सध्या आमच्याकडे पाणी उपलब्ध आहे परंतु वीज वेळेवर मिळत नाही,. शेतातील उभी पिके जळून जात आहे त्यामुळे आ धुळखंड यांनी मानले ठ तास पूर्ण दाबाने वीज पुरवठा करावा महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांची सौजन्याने वागत नाही. अनेक वर्षाच्या जीर्ण झालेल्या विजेच्या तारा खालील कळत असल्यामुळे जीवित हानी होण्याची शक्यता आहे अशा एका मागे एक शेतकऱ्यांनी समस्या आ अमोल खताळ यांच्या समोर मांडल्या त्यावर उपाययोजना करण्याचे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले

 

 

 

विजेचे मीटर रिडींगच्या अनेक ग्राहकां च्या तक्रारी होत आहे.येथून पुढील काळा मध्ये जर कोणाचे मीटर रिडींग होत नसेल आणि बिल चुकलं असेल तर ते तात्काळ दुरुस्त करून द्या.विजेचे मीटर रिडींग करणाऱ्या एजन्सी धारकांबरोबर वारंवार बैठका घेऊन त्यांना वेळेच्यावेळी बिले घ्यायला लावलेले आहे.परंतु जर त्यांच्या कामात सुधारणा होत नसेल तर त्यांच्या वर सुद्धा कारवाई केली जाईल आणि येथून पुढे महावितरणच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांशी व्यवस्थित वागा नाहीतर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल

 

श्री अनिल थोरात ( कार्यकारी अभियंता महावितरण कंपनी संगमनेर उपविभाग )

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *