मुंबई । झुंजार न्यूज
माजी जिल्हा परिषद सदस्य मुळा सहकारी साखर कारखाना सोनई चे माजी संचालक!आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते अशोकराव गायकवाड यांनी नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे ना.अजितदादा पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.

यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी मंत्री आ.संजय बनसोडे, आ.शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी नगर शहर अध्यक्ष संपत बारस्कर आदी उपस्थित होते.

अशोक गायकवाड यांच्या समवेत प्रा.भीमराव पगारे, सुरेशराव गायकवाड, सुखदेव शिंदे, ल्युथर गायकवाड आदींनी पक्ष प्रवेश करुन ना.अजित दादा पवार यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या व अशोक गायकवाड यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान पाहता त्यांच्यावर राज्यपातळीवरील जबाबदारी द्यावी असे आ.जगताप यांनी ना.अजितदादा पवार यांना विनंती केली.

यावेळी अशोक गायकवाड म्हणाले की, शहरात व जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाचे नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या ध्येय, धोरणाप्रमाणे काम करुन, पक्ष बळकट करण्याचे काम केले जाणार असल्याचा निर्धार व्यक्त केला

अशोकराव गायकवाड हे तारुण्यापासून आंबेडकरी चळवळीत आक्रमक , परखडपणे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचीत आहे चळवळीच्या माध्यमातून कार्यकर्तेचा संच उभा करणे ही त्यांची हातोटी असून प्रशासकिय लोकासह वरिष्ठांना आपल्या बुध्दी युणुक दाखविण्यात माहिर आहे . घेतलेल्या भूमिकेत ठाम राहून काम करणे हे त्यांचे वैशिष्टये असून संपूर्ण आयुष्य दलित पँथर , रिपब्लिकन चळवळीत घालविले मात्र त्यातून कुठल्या प्रकारे वाव मिळाला नसल्याची खदखद निर्माण झाली संध्याची राजकिय परिस्थितीत प्रत्येक राजकिय नेतृत्व हे हिऱ्याच्या शोधात असून अशोक गायकवाड यांच्या माध्यमातून अजित पवार यांना परखड व संघटनात्मक असणारा एक आंबेडकरी कार्यकर्ता हाती लागल्याने जिल्हयाचीचं नव्हे तर राज्याची एक राजकिय दिशा मिळणार आहे .
