अधिवेशनात आमदार अमोल खताळ यांनी सरकारकडे केल्या विविध मागण्या
संगमनेर । झुंजार न्यूज
मुंबई येथे विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये संगमनेर तालुक्याचे महायुतीचे आमदार अमोल खताळ यांनी प्रथमच या मतदार संघातील महत्त्वाच्या व कधी न विचारले ल्या विविध प्रश्नांवर राज्य शासनाचे लक्ष वेधले आहे आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाने मदत करावी अशीही मागणी आमदार अमोल खताळ यांनी केली आहे
संगमनेर मतदारसंघात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. नागरिकांना तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता आहे.मात्र,शासनाने घालून दिलेल्या किचकट अटींमुळे मंजुरीसाठी सात-आठ दिवस लागतात. त्यामुळेच सर्वसामान्य जनता तहानलेली राहत आहे.त्यामुळे शासनाने टँकर मंजुरीसाठीच्या सर्व अटी शिथिल करण्यात याव्यात अशी मागणी
आ अमोल खताळ यांनी विधानसभेत मांडत राज्य सरकारचे या मूलभूत प्रश्नां कडे लक्ष वेधले आहे. यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या टेबलांवर वेळ दवडण्याऐवजी तातडीने मंजुरी द्यावी. पाण्याचा गंभीर प्रश्न असल्याने या प्रश्नात प्रशासनाने दिरंगाई न करता त्वरित उपाय योजना कराव्यात.या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधले असून, लोकहिताचा विचार करून त्वरित निर्णय घेण्याची मागणी यावेळी आमदार अमोल खताळ यांनी सरकारकडे केली
संगमनेर तालुक्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाने संगमनेरला MIDC स्थापन करावी तसेच संगमनेर तालुक्यातील पेमगिरी (शहागड) किल्ल्यावर जिजामाता यांचे वास्तव्य राहिले आहे . त्यामुळे हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी तसेच किल्ल्याच्या विकासासाठी निधी मिळावा. तामकडा रोपवे, सौंदर्यकरणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा राज्य शासनाकडून सध्या पाच कोटीचा आमदार निधी मिळत आहे परंतु एवढ्या कमी निधीमध्ये विकास कामे करणे अवघड आहे त्यामुळे राज्य शासनाने हा आमदार निधी ५ कोटीं वरून १० कोटी रुपये करावा अशी मागणी अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सभागृहात केली.
संगमनेर मतदारसंघात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे त्यामुळे उपसा जल सिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी जलसंपदा व जलसंधारण विकास विभागाकडून अधिक निधी मिळावा. ग्रामीण रस्ते विकास तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ५० कि.मी चे. रस्ते वाढविण्यात यावे. ऊर्जा विभागातील महत्त्वाच्या योजना आरडी एसएस तसेच इतर योजनांसाठी निधी मिळावा. सध्या कोपरगाव येथे सहकार न्यायालय आहे मात्र सहकारी संस्थांच्या न्यायालयीन कामकाजासाठी कोपरगाव लांब पडत आहे त्यामुळे संगमनेर व अकोले साठी संगमनेर येथे सहकार न्यायालय सुरू करावे तसेच सद्यस्थितीला संगमनेर शहरातील पोलीस वसाहतीची अत्यंत दुरावस्था झाली आहे त्यामुळे पोलिस कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी चांगली वसाहत उभी राहणे आवश्यक आहे त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. या महत्त्वा च्या प्रश्नांवर महायुतीचे आमदार अमोल खताळ यांनी सरकारचे लक्ष वेधले
