कोपरगांव । झुंजार न्यूज

 

 

 

 

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात यांचा नुकताच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

 

 

Oplus_131072

अरुण खरात यांचे सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामाची दखल रामदास आठवले यांनी घेतली असून आठ दिवसांपूर्वीच अरुण खरात यांना फोनद्वारे संपर्क साधून सत्कार सोहळ्यास निमंत्रित केले होते. निराधार ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर यांना न्याय मिळवून देण्यासाठी अरुण खरात यांनी खूप प्रयत्न केले होते.

 

 

 

Oplus_131072

 

शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहावरती हा सत्कार सोहळा पार पडला असून रामदास आठवले यांचे हस्ते अरुण खरात यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

 

 

Oplus_131072

 

यावेळी विजयराव वाकचौरे , श्रीकांत भालेराव, सुरेंद्र थोरात, पप्पू बनसोडे, दीपकराव गायकवाड, भीमा बागुल, सुनील मोकळ, संजय विघे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed