शिबलापूर । झुंजार न्यूज

 

 

संगमनेर तालुक्यातील शिबलापूर भैरवनाथ महाराज यात्रा निमित्याने येथे सालाबाद प्रमाणे बैलगाडा शर्यतीचे आयोजन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले होत. या शर्यतीत मोठया उत्साहाने बैलगाडा मालक – चालकांनी आपला सहभाग नोंदविला .

 

 

Oplus_131072

 

बैलगाडा शर्यतीचा उगम शेतीच्या कामांशी संबंधित असून शेतकरी त्यांचे बैल आणि गाडी यांच कौशल्य दाखविण्यासाठी तसेच स्पर्धा करण्यासाठी प्रयत्नशील असतात बैलांची ताकद, गती, आणि गाडी हाकण्याच्या कौशल्याचा या शर्यतीत महत्त्वाचा भाग असल्याने बैलगाडा शर्यती ग्रामीण जीवनाचा एक अविभाज्य भाग बनल्या आहेत. या शर्यतींमुळं गावातील एकोपा आणि सामाजिक एकात्मता वाढते. या शर्यतींना एक प्रकारे खेळ म्हणूनच नव्हे तर परंपरेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून ही पाहिलं जात आहे .

 

 

 

Oplus_131072

 

ही शर्यत शिबलापूर ते पानोडी शिवाजवळील थोरातांच्या शेतामध्ये भरविली होती . जवळ जवळ शर्यतीकरिता १ कि मी चे अंतर शर्यतीकरिता ठेवले होते . ५ , ४ , ३ ,२ , दीड हजार रुपये पर्यंत बक्षिसे ठेवली होती या शर्यतीचे सुत्रसंचालन खंडू आंधळे यांनी केले होते .

 

 

Oplus_131072

 

यावेळी प्रभारी संरपच सुनिल तबाजी मुन्तोंडे , प स माजी सदस्य तबाजी मुन्तोंडे , विखे कारखान्याचे माजी संचालक जेहूरभाई शेख , आण्णासाहेब म्हस्के , वालझाडे , विजय मुन्तोंडे , प्रकाश शिंदे , दिपक रक्टे , बाळू मुन्तोंडे , बाळू नागरे , तात्यासाहेब गायकवाड , बापुसाहेब पाबळ आदीसह मोठ्या संख्येने बैलगाडा शर्यती प्रेमी , शेतकरी , चालक – मालक उपस्थित होते.

 

 

 

Oplus_131072

 

 

सालाबाद प्रमाणे यात्रा निमित्ताने बैलगाडा शर्यती ठेवल्या होत्या राहुरी , सिन्नर , संगमनेर , अकोले , जुन्नर तालुक्यातून बहुसंख्ये बैलगाडा चालक – मालक सहभागी झाल्याने मोठया उत्साहात स्पर्धा झाल्या तर भैरवनाथ यात्रा यशस्वी करण्याकरिता ग्रामस्थांचे सहकार्य लाभले .

 

सुनिल मुन्तोंडे ( प्रभारी संरपच , शिबलापूर )

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed