आश्वी । झुंजार न्यूज

 

 

संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील खळी येथे गावचे कुलदैवत श्री खंडोबा महाराज यात्रा उत्सव चैत्र पौर्णिमा निमित्त आयोजित केली आहे .

 

 

 

या यात्रेनिमित्त शनिवारी साय ठिक नऊ वाजता सुनील कुमार संभाजीनगर करसह चंदाराणी संभाजीनगर कर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळ तसेच रविवार दिनांक 13 4 2025 रोजी सकाळी तमाशाच्या हजेरी तसेच सायंकाळी चार वाजता जंगी कुस्ती हंगामा व सात वाजता मानाच्या काठीची भव्य मिरवणूक गड ते खळी गावापर्यंत चौका चौकातून मिरवणूक निघणार आहे या यात्रेनिमित्त खळी गावासह पंचक्रोशीतील शेजारील गावची खंडोबा भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात

 

Oplus_131072

 

 

तसेच खळी गावातील नोकरीनिमित्त बाहेरगावी मुंबई पुणे नगर नाशिक अन्य ठिकाणी असणारे भक्त मंडळ मोठ्या प्रमाणामध्ये या यात्रेमध्ये सहभागी होत असतात व यात्रेचा आनंद लुटतात या यात्रेमध्ये तळी भंडार नैवेद्य देवाला दाखविणे याकरिता भक्त मंडळांची खूप गर्दी होते तरी या यात्रेसाठी भक्त मंडळांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव स्वीकृत विश्वस्त भक्त मंडळाने केले आहे

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *