पानोडी । झुंजार न्यूज

संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणा-या आणि आपल्याला हक्क मिळवून देणा-या महान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 14 एप्रिल दिवशी संपूर्ण जगभर धुमधडाक्यात जयंती साजरी केली जाते. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच न्याय, समता आणि बंधुतेचा अनोखा संगम! त्यांच्या विचारांनी लाखो लोकांचे जीवन उजळवले, अन्यायाविरुद्ध लढण्याचं बळ दिलं. दरवर्षी १४ एप्रिल रोजी साजरी होणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे फक्त एक स्मरण दिन नव्हे, तर हा दिवस आहे प्रेरणेचा, परिवर्तनाचा आणि आत्मपरीक्षणाचा. भारताच्या संविधानाचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांनी केवळ कायदे बनवले नाहीत, तर प्रत्येक वंचित घटकाला आपलं हक्काचं स्थान दिलं.

शिक्षण, समतेचा अधिकार, आणि सामाजिक न्याय यासाठी त्यांचा संघर्ष आजही नव्या पिढीला मार्गदर्शक ठरतो.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या विचारांना प्रणाम करून, त्यांचं स्वप्न साकार करण्याची नवी शपथ घेऊ या. चला तर मग, त्यांच्या आदर्शांना उजाळा देणाऱ्या या दिवशी एकमेकांना शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्याची प्रेरणा सर्वदूर पोहचवू या !

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *