संगमनेर वकील संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर
संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुका वकील संघाच्या नव्याने फेरनिवड झालेल्या कार्यकारिणीचा सत्कार आज आमदार सत्यजीत तांबे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. असून न्याय मिळवून देण्यासाठी काम करणाऱ्या वकिलांच्या सुरक्षिततेसाठी आपण कायम कटिबद्ध असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे
.
यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की,वकील स्वरक्षण कायदा लागू करण्यात यावा यासाठी आपण सभागृहात व सभागृहा बाहेर सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगितले. तसेच वकिलांचे हित जपण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी हा कायदा लवकरात लवकर लागू व्हावा यासाठी पुढे देखील ठोस प्रयत्न करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

वकिलांचा समाजातील महत्त्वाचा वर्ग म्हणून सन्मान व्हावा, तसेच न्यायव्यवस्थेचा गाभा अधिक सक्षम होण्यासाठी वकील संघांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. संगमनेर वकील संघाने वेळोवेळी उत्कृष्ट कामगिरी केली असल्याचे मत आ. तांबे यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी अध्यक्षपदी ॲड. जगन्नाथ वामन, उपाध्यक्षपदी ॲड. प्रसाद भडांगे आणि महिला उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता सस्कर यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणीची फेरनिवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. खजिनदारपदी ॲड. बबन नाईकवाडी, सचिवपदी ॲड. योगेश गुंजाळ तर सदस्य म्हणून ॲड. स्वाती सांगळे, ॲड. अबरार देशमुख, ॲड. सचिन व्यवहारे, ॲड. किरण भोकनळ, ॲड. रवी वर्पे, ॲड. शिवाजीराव काकड यांचीही पुन्हा निवड करण्यात आली.

संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या चर्चेनंतर निवडणूक न घेता गतवर्षीच्या कार्यकारिणीने केलेल्या कार्याची दखल घेत त्याच कार्यकारिणीला २०२५-२६ या वर्षासाठी संधी देण्यात आली.

नूतन कार्यकारिणीच्या वतीने अध्यक्ष ॲड. वामन, उपाध्यक्ष ॲड. भडांगे व महिला उपाध्यक्ष ॲड. सस्कर यांनी उपस्थितांचे आभार मानून आगामी काळात वकिलांच्या कल्याणासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

नूतन कार्यकारणीचे लोकनेते बाळासाहेब थोरात ,माजी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे डॉ जयश्रीताई थोरात यांनी अभिनंदन केले आहे
