माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थिती

 

 



संगमनेर । झुंजार न्यूज

 

 

 

सहकारातून सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा संगमनेरचा सहकार हा देशासाठी दिशादर्शक ठरला असून मा.महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये बुधवार दि. 23 एप्रिल व गुरुवार दि. 24 एप्रिल 2025 रोजी तालुक्यातील विविध ठिकाणी सभासद शेतकरी युवक व हितचिंतकांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

 

 

 

 

Oplus_131072

थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तात्यांवर संगमनेर मधील थोरात सहकारी साखर कारखाना व सर्व सहकारी संस्थांचा कारभार हा राज्याला दिशादर्शक ठरला आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व सहकारी संस्थांनी तालुक्याच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम सभासद शेतकरी ऊस उत्पादक कामगार यांचे हित जोपासताना उच्चांकी भाव दिला आहे.

 

 

 

Oplus_131072

 

या कारखान्याचा स्वच्छ प्रामाणिक व पारदर्शक कारभार यामुळे सभासद शेतकरी नागरिक युवक महिला यांचा मोठा विश्वास कारखान्याच्या व्यवस्थापनावर आहे. 2025 – 30 या वर्षाकरिता होऊ घातलेली निवडणूक ही लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध होण्याकडे वाटचाल सुरू आहे. लोकनेते थोरात यांच्या नेतृत्वावर सर्व तालुक्यातील सुजाण नागरिक, सभासद, शेतकरी, युवक यांचा मोठा विश्वास राहिला आहे.

 

 

 

Oplus_131072

तालुक्यातील सर्व सभासद शेतकरी युवक महिला व हितचिंतक या सर्वांशी संवाद साधण्याकरता लोकनेते बाळासाहेब थोरात व मा.आ.डॉ.सुधीर तांबे व विविध मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये बुधवार दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9.30 कृष्णा लॉन्स नाशिक – पुणे हायवे गुंजाळवाडी येथे तर सकाळी 11 वाजता साई मंगल कार्यालय समनापुर येथे त्यानंतर सायं. 6 वा. जय मल्हार लॉन्स आशापीरबाबा रोड निमोन येथे व सायंकाळी 7.30 वा. महाराजा लॉन्स तळेगाव येथे स्नेहसंवाद मेळावा होणार आहे.

 

 

 

Oplus_131072

 

यानंतर गुरुवारी सकाळी 9 वा. रिद्धी सिद्धी मंगल कार्यालय जाखुरी येथे व सायंकाळी 6.30 वा. शिव ओंकार मंगल कार्यालय जोरवे येथे स्नेहसंवाद मेळावा होणार आहे. तरी या स्नेहसंवाद मेळाव्यासाठी थोरात सहकारी साखर कारखान्याचे सर्व सभासद, शेतकरी, युवक, हितचिंतक या सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शेतकरी विकास मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed