आश्वी । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील असणाऱ्या पानोडी व परिसरात अवकाळी पावसाने मोठ्या नुकसान केले असून आठवडयापासून सुरु असलेल्या रिमझीम अवकाळी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आला शेती पिकांचे प्रचंड नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. प्रामुख्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण ऐन कांदा काढणीच्या वेळी पाऊस येत असल्याने कांदयाल पाणी लागल्याने मोठया प्रमाणात कांदा सडल्याचे दिसून येत आहे .

राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसाने अहिल्यानगर जिल्ह्यात देखील जोरदार हजेरी लावली आहे. यातच संपूर्ण संगमनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अवकाळी पावसाने झोडपले असून या परिसरात शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेला कांदा पूर्णतः भिजल्यामुळे सडला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय या कांद्याला कवडीमोल भाव मिळण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे.

पानोडी येथील शेतकरी रावसाहेब घुगे व आण्णासाहेब घुगे यांनी प्रत्येकी अडीच – अडीच एकर कांदा केला होता तो कांदा काढणीयोग्य झाल्याने कांद्याची काढणी करून त्याला मार्केटमध्ये नेण्यापूर्वी काढून ठेवला होता. मात्र त्यांनी शेतात सुकवण्यासाठी काढून ठेवलेला कांदा सुकण्या आधीच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे या अवकाळी पावसामध्ये भिजून हा कांदा पूर्णतः सडला आहे. यात घुगेसह अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील काढून ठेवलेले कांदे हे शेतातच पडलेले असताना अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कांदे अक्षरशः सडून गेले आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांसमोर मोठ संकट उभं ठाकल असून नुकसानग्रस्त शेतीची प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पाहणी करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळवून द्यावी; अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे.

अडीज एकरात कांदा लागवडीकरिता नांगरणी , मशागत कांदा रोपे , विविध प्रकारे औषधे खते , मजुरी व काढणी पर्यत अडीज लाख रुपये खर्च आला मात्र अचानक आलेल्या अवकाळी पाऊसाने आमची अवकाळाचं केली अडीज एकर कांदा डोळ्यात देखत सडल्याने नफा सोडा खर्च ही निघणार नसल्याने मोठे आर्थिक संकट उभे राहिले त्यामुळे आता पालकमंत्र्यांनीचं याकडे लक्ष घालावे
रावसाहेब घुगे ( शेतकरी , पानोडी )
