हळदी समारंभ ते मुलगी सासरी पाठविण्या पर्यंतच्या सर्व कामात वर्ग मित्र मैत्रिणी सर्वांत पुढे राहात जपली मैत्री लग्न सभारंभात सर्वत्र चर्चा व कौतुक
◽ बत्तीस वर्षीनतंरच्या भेटीने वर्गमित्र गहिवरले.
आश्वी | झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल प्रवरा ग्रामिण शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील सन १९९२-९३ च्या दहावी इत्तेतील माजी विद्यार्थ्याचे स्नेह सम्मेंलन सर्वात आवडत्या मित्राच्या मुलीच्या विवाहात संपन्न झाले

विद्यालयाचे माजी विद्यार्थी व प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे चिफ इलेक्ट्रीकल इंजिनिअर शाम गायकवाड, यांची कन्या तसेच प्रवरा बँकेचे संचालक बापुसाहेब गायकवाड यांची नात चि.सौ.का. श्रृतिका व दुर्गापुर येथील कोंडीरामशु रावसाहेब पुलाटे यांचे चिरंजिव अभय यांचा शुभविवाह नुकताच चिंचपुर येथील सप्तपदी मंगलकार्यालयात मोठया उत्साहात संपन्न झाला

या विवाह सोहळ्यास मा.जि.प.अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पा. युवा नेते मा.खासदार सुजय विखे सुस्मिता विखे धुव्र विखे पाटील यांच्या सह जिल्हयातुन मोठ्या संख्येने ग्रामस्थ मित्र नातलग उपस्थित होते मात्र या सर्व वऱ्हाडी मंडळीचे लक्ष्य या सर्व माजी विदयार्थी वर्गाकडेच होते सर्व मित्र व मैत्रिणी सपत्नीक अगदी हळदी समारंभापासुन उपस्थित होते सर्व नियोजन ते करत होते तर एकत्र येऊन सर्व मित्र मैत्रिणींनी एकमेकांना भेटुन गप्पा मारल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला नवीन मैत्री फुलवल्या मित्राच्या मुलीच्या लग्नात एकत्र येणे मैत्रीचे प्रतिक होते व मित्राच्या मुलीच्या विवाहात नियोजन अतिशय सुंदर करत समाजाला चांगला संदेश दिला असे गौरव उदगार शालिनिताई विखे पाटील यांनी काढत या सर्व माजी विद्यार्थोंना शुभेच्छा दिल्या

यावेळी बी. जे. ऑटोमेशनचे संस्थापक बापूसाहेब सांगळे व सुवर्णा बिहानी यांनी पुढाकार घेऊन हा योग सोशल मिडिया स्नेह सम्मेंलन व विवाहच्या माध्यमातून घडवत अनेक वर्षानतंर प्रत्यक्ष भेट झाल्यामुळे या माजी विद्यार्थ्यानच्या चेहऱ्यावर आनंद ओसडून वाहत होता.

यावेळी बिलाल शेख, आरटीओ भिमराज नागरे, सुनिल गिते , सुरेश भोसले,जगन्नाथ घुगे ,सुषमा धस, योगिता खपके , रवींद्र कोळसे,बबलु पठाण, डॉ.संजय भवर , बापू सांगळे अनिल वाडेकर सुवर्णा बिहानी ,सुनिता नागरे, संगिता गागरे, सविता सोनवणे सुनिता सांगळे ,संगिता भोसले बंडु मुन्तोडे ,अजित म्हस्के ,भारत भडकवाड, प्रकाश भडकवाड ,बाळासाहेब लावरे, किशोर मांढरे ,अनिल दातीर, लक्ष्मण गोडगे, अजित म्हस्के, चांगदेव खेमनर, विजय शिंदे, संजय शिंदे, शैला डोंगरे, नंदा माने , अनिल मांढरे, किशोर मांढरे, विलास गायकवाड, सुरेश पवार शेडगावचे मा. उपसरपंच व नवनिर्वाचीत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सह.साखर कारखान्याचे संचालक दिलिप नागरे, आदिसह मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते.
