◻️पत्नी व मुलांच्या प्रसंगावधानतेमुळे पुढील अनर्थ टळला

◻️वनविभागाने खबरदारीच्या उपायोजना कराव्यात ; मच्छिंद्र खेमनर (जानकर) यांची मागणी

 

आश्‍वी l झुंजार न्यूज 

 

 

जनावरांना गिनी गवत तोडत असलेल्या मच्छिंद्र दगडू कालेकर (वय – ५६) यांच्यावर मंगळवारी (दि. १७ जून) सकाळी ९ वाजेच्या सुमारास बिबट्याने प्राणघातक हल्ला करुन जखमी केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर, जखमी मच्छिंद्र कालेकर यांना स्थानिकानी तात्काळ घुलेवाडी येथे उपचारासाठी दाखल केल्याची माहिती मिळाली आहे.

 

 

Oplus_131072

 

याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर शिवारातील कारवाडी येथील मच्छिंद्र दगडू कालेकर हे नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास शेतात जनावरांसाठी गिनी गवत आणण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या समवेत पत्नी आणि मुलगा जीवन कालेकर देखील होते. त्यांची पत्नी व मुलगा शेतातील इतर काम करत होते. तर, ते स्वतः खाली वाकून गिनी गवत तोडत होते.

 

 

Oplus_131072

 

यावेळी शिकारीच्या शोधात दबा धरून बसलेल्या बिबट्याला खाली वाकलेले मच्छिंद्र कालेकर हे सावज वाटल्याने त्यांच्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. परंतु, जवळचं असलेल्या पत्नी व मुलाने प्रसंगसावधान राखत जोरदार आरडाओरडा करत तिकडे धाव घेतल्यामुळे बिबट्याने तेथून धूम ठोकली. माहिती मिळताच संदीप होडगर, किरण कालेकर, सचिन चंद, समाधान होडगर, जीवन कालेकर, नितिन होडगर आदीनी तात्काळ जखमी कालेकर यांना घुलेवाडी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर, कालेकर यांच्या डोक्याला आणि नाकाला दुखापत झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

 

 

Oplus_131072

 

 

दरम्यान हल्ला झालेल्या कारवाडी परिसरात बिबट्याच्या पशुधनावर हल्ल्याची मालिका सुरू असून आता थेट माणसांवर हल्ला करण्यापर्यत या बिबट्याची मजल गेल्यामुळे त्यांचा वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक शेतकरी व नागरीकांनी केली आहे.

 

 

 

Oplus_131072

 

मागील अनेक दिवसांपासून कारवाडी परिसरात बिबट्याची दहशत आहे. भर दिवसा कालेकर यांच्यावर बिबट्याने प्राणघातक केल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने हा बिबट्या तात्काळ जेरबंद करावा. त्याचबरोबर कालेकर यांच्या उपचारांचा खर्च देखील वनविभागाने द्यावा आणि भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी खबरदारीच्या उपायोजना कराव्यात.

 

 

मच्छिंद्र खेमनर (जानकर), संगमनेर तालुकाध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *