आश्वी । झुंजार न्यूज

 

 

 

प्रवरा मेडिकल ट्रस्ट ग्रामपंचायत पिंप्री लौकी अजमपुर जनसेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सर्व रोग निदान शिबिरामध्ये २५० रुग्णांची विविध आजारांची तपासणी करून औषध उपचार करण्यात आले .

 

 

 

सर्व रोग निदान शिबिराचे उद्घाटन सरपंच सौ संगीता भारतराव गीते यांनी केले

 

 

 

याप्रसंगी बोलताना जनसेवा मंडळाचे अध्यक्ष भारतराव गीते म्हणाले ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील महिला वृद्ध व बालकांना आरोग्याच्या सुविधा मिळण्याची मोठी अडचण होत होती मात्र शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते नामदार राधाकृष्ण विखे पाटील व प्रवरा मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र विखे पाटील व संस्थेच्या विश्वस्त व सचिव सौ.सुवर्णाताई राजेंद्र विखे पाटील तसेच उपसंचालक श्री.ध्रुव राजेंद्र विखे पाटील* यांच्या प्रयत्नाने पिंपरी गाव मध्ये प्रवरा ग्रामीण आरोग्य केंद्र सुरू करून रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. हे रुग्णालय गावातील ग्रामस्थांना मोठे वरदान ठरले .

 

 

Oplus_131072

 

या रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांना उपचारआजारावर केले जातात मात्र सर्वसामान्य माणसांना मोठ्या हॉस्पिटलला जाणे शक्य नसत नसल्यामुळे अनेक महिला वृद्ध आजार अंगावर काढतात त्यामुळे मोठमोठ्या संकटांना तोंड द्यावे लागतील त्यामुळे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सर्व रोग निधन शिबिरामध्ये २५० रुग्णांची तपासणी करून विविध आजारावर उपचार करण्यात आले तर ४०गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांना प्रवरा हॉस्पिटलच्या माध्यमातून ऍडमिट करण्यात आले व त्यांना मोफत उपचार देण्यात आले .

 

 

 

Oplus_131072

रुग्णसेवा ही ईश्वर सेवा असून ती खऱ्या अर्थाने विखे परिवारां नी केल्यामुळे एक मोठा पुण्याचे काम त्यांच्या हातून घडत असल्याची भावना श्री भारतराव गीते यांनी व्यक्त केली त्यांनी आपल्या गावात भविष्यकाळात ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून विविध सेवा उपलब्ध करण्याचा मानस व्यक्त करून दरवर्षी विविध प्रकारचे सर्व रोग निदान शिबिर घेऊन ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकरी शेतमजूर यांना मोठा दिलासा देण्याचे आश्वासन दिले

 

 

Oplus_131072

प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या माध्यमातून राबवलेल्या सर्व रोग निदान शिबिर आयोजित केलेल्या प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या अधिकारी वर्गाचं डॉक्टरांचा त्यांनी आभार मानले

 

 

 

Oplus_131072

याप्रसंगी विविध विभागाचे डॉक्टर उपस्थित होते तसेच प्रवरा मेडिकलचे अधिकारी यांनी अतोनात परिश्रम घेतले

 

 

 

Oplus_131072

 

या शिबिराप्रसंगी भाऊसाहेब लावरे प्रा कान्हु गिते भाऊसाहेब मुंढे रामदास दातीर संजय बिडवे कैलास खेडकर मेजर सुनिल गिते विजय कदम तान्हाजी गिते लक्ष्मण गिते भास्करराव दातीर सोशल वर्कर आव्हाड गणपत नाना गिते रमेशराव कदम विजय तावजी कदम डॉ आहेर मॅडम सह ग्रामस्थ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितित होते . आभार मेजर सुनिल गिते यांनी मानले

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *