आमदार अमोल खताळ यांनी पवार व पिंजारी कुटुंबीयांचे केले सांत्वन

 

संगमनेर । झुंजार न्यूज

 

भूमिगत गटार दुर्घटनेत मयत झालेल्या ठेकेदार आस्थापनेवरील अतुल पवार याच्या कुटुंबीयांना ३० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचे पत्र आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते देण्यात आले आहे.तसेच पिंजारी यांच्या कुटुंबीयांना सुद्धा शासनाच्या वतीने भरीव स्वरूपाची मदत मिळवून देणार असल्याचा विश्वास आ खताळ यांनी व्यक्त केला आमदार अमोल खताळ यांनी मदिना नगर येथील जावेद पिंजारी यांच्या निवास स्थानी तर संजय गांधीनगरमधील रतन पवार यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले

 

 

 

 

 

 

संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड वरील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल जवळ भूमिगत गटारीच्या चेंबरमधील मैला काढताना पवार याचा मृत्यू झाला. त्यांना वाचवण्यासाठी गेलेले पिंजारी यांचाही प्राण गेला. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच आ. अमोल खताळ यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि पोलिस प्रशासनाला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. संबंधित ठेकेदार हे एका पक्षाशी संबंधित असल्याने गुन्हा दडपण्याचा प्रयत्न झाला. आमदार खताळ यांनी दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई भूमिका घेतल्यामुळे तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.भरीव मदत मिळून तसेच पवार यास वाचविण्यात गेलेल्या रियाज जावेद पिंजारी यांच्या कुटुंबीयांना सुद्धा भरीव स्वरूपाची मदत कशी देता येईल याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उप मुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी आपण चर्चा करणार आहे. त्यांच्या माध्यमातून भरीव स्वरूपात आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास आ खताळ यांनी व्यक्त केला.
या प्रकरणी हलगर्जी करणारे ठेकेदार यास लवकरात लवकर अटक व्हावीअशी मागणी मयत तरुणांच्या नातेवाईकांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली. त्यावर आमदार खताळ म्हणाले की गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे त्यामुळे अटक होणारच. त्यांनी कितीही जामिनासाठी प्रयत्न केला तरी कायद्या पासून कोणीही पळू शकणार नाहीत.” असाही विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला

 

 

 

Oplus_131072

 

यावेळी माजी उपनगराध्यक्ष व भाजप नेते जावेद जहागीरदार, ॲड. श्रीराम गणपुले, शौकत जहागीरदार, मजहर शेख, बबलू काझी ,गुड्डू शेख राहुल भोईर आसिफ पिंजारी मेहबूब शकील पिंजारी इरफान मसूरी आणि इरफान पिंजारी आणि मयत अतुल पवार यांच्या निवासस्थानी प्रकाश पवार आप्पा पवार सोमनाथ रणशूर अण्णा शिंदे,शशिकांत पवार सतीश शिंदे नारायण शिंदेअंबादास शिंदे संतोष पवार बबलू पवार शरद रणशूर संजय शिंदे यांच्यासह अनेक उपस्थित होते.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *