दिव्यांगा भवनाचे काम लवकरच सुरू होणार-आ खताळ

 

 

संगमनेर । झुंजार न्यूज

 

 

संगमनेर दिव्यांग भवन व्हावे ही अनेक दिवसाची दिव्यांग बांधवांची मागणी होती.त्यानुसार नगर पालिकेने नेहरू गार्डनजवळ दिव्यांग भवनसाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. त्या दिव्यांग भवनाचे काम लवकरच सुरू होणार असल्याचा विश्वास आ अमोल खताळ यांनी व्यक्त केला

 

 

संगमनेर शहरातील गणेश नगर येथील नगरपालिकेचे योग भवनात दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम हात पाय कॅलिपर्स बसविणे तसेच दिव्यांग प्रमाणपत्र आ. अमोल खताळ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावरती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ राज कुमार ज-हाड वैद्यकीय अधिकारी संदीप कचेरीया शिव सेना तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे शहर प्रमुख दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी, आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार, दिव्यांग साह्यसेनेचे जिल्हाध्यक्ष जालिंदर लहामगे वडगावपानचे सरपंच श्रीनाथ थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते

 

 

आमदार खताळ म्हणाले की माझ्या राजकीय प्रवासात संजय गांधी निरा धार योजनेच्या माध्यमातून काम करण्याची मला संधी मिळाली आणि त्यातूनच दिव्यांग बांधवांच्या गरजांची खरी ओळख झाली आहे .यापूर्वी केंद्र सरकारच्या माध्यमातून माजी खा डॉ सुजय विखे यांनी संगमनेर तालुक्यात वयोश्री’ योजनेच्या माध्यमातून लाखो ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवां पर्यंत पोहोचलो.पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटिल ही जरी अहिल्यानगरचे पालकमंत्री असले तरी त्यांनी संगमनेर तालुक्याचे पालकत्व घेतले आहे. अन त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य पुढे आणखी गतिमानतेने सुरू राहणार आहे. शासनाच्या अनेक योजना पारदर्शकतेने आपण राबवत आहोत. कुणाला कोणत्याही कामासाठी पैसे देऊ नका त्यासाठी माझेआणि पालक मंत्र्यांचे कार्यालय, तसेच विळद फाउं डेशन’ तुमच्या साठी नेहमीच खुले राहील असे आ खताळ यांनी सांगितले आपण फक्त निवडणुकीचे पुरते राजकारण करत असतो मात्र निवडणुका संपल्या की समाजकारण करत असतो.

 

 

 

Oplus_131072

 

दिव्यांग, वंचित,आणि गरजूवंतांना न्याय मिळावा, तसेच त्यांना त्यांच्यासाठी शासनाच्या आणि विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमा तून सर्वतोपरी मदत पोहोचवली जावी हा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील.सर्व दिव्यांग बांधवांचे माझ्यावर प्रेम आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच मी या तालुक्याचा आमदार झालो आहे त्यामुळे तुम्हाला जेव्हा काही अडचणी येतील त्या वेळी तुमचा भाऊ, तुमचा मुलगा २४ तास तास तुमच्या पाठीशी भक्कम उभा राहील असा विश्वास आ खताळ यांनी दिव्यांग बंधू-भगिनींना दिला यावेळी पाच प्राथमिक दिव्यांग बांधवांना कॅलिपर्स तसेच दिव्यांग प्रमाणपत्राचे वाटप आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेनेचे उपशहर प्रमुख अजित जाधव यांनी केले तर आभार शिवसेनेचे शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी मानले

 

 

 

 

केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन आणि दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत शिबिरात १२७ दिव्यांग बांधवांनी नोंद केली होती त्या पैकी ८२ जणांना कॅलिपर्स मंजूर झाले होते.त्यातील १० जणांचे नामंजूर केले ७२ जणांना तसेच ४१ दिव्यांग बंधू-भगिनींना प्रमाणपत्र आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले

 

 

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *