शिर्डी । झुंजार न्यूज
भारतीय जनता पार्टी-शिरडी शहराचा अविस्मरणीय “नवनियुक्त पदाधिकारी नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रम” नामदार मा.श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

कार्यक्रमस्थानी नामदार राधाकृष्ण विखे साहेब यांचे शुभहस्ते गोमातेचे पूजन करून “गोसेवा दिन साजरा” करण्यात आला.तसेच भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जातीच्या शिर्डी शहर अध्यक्षपदी श्री प्रसाद बाळू सुरंजे व उपाध्यक्षपद सचिवपद. सहसचिव पद. सोशल मीडिया पद. कार्याध्यक्ष पद.सदस्य पद. इद्यादी पदे. नामदार विखे पाटील यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने पक्षप्रवेश झाले.

शहराध्यक्ष मा.रविंद्र(तात्या) गोंदकर यांनी केलेल्या कार्यक्रमाचे व समर्पक,सर्व घटकांना सामावून घेणाऱ्या कार्यकारिणीच्या नियोजनाचे कौतुक केले..!

