बहिण भावाच्या नात्याचा अमृतवाहिनीच्या छोट्या बालकांनी जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसमवेत गुंफला बंध
संगमनेर । झुंजार न्यूज
अमृतवाहिनी संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ. शरयू ताई देशमुख यांच्या अमृतवाहिनी मॉडेल स्कूल व जिल्हा परिषद शाळा यांच्यामधील विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद व्हावा याकरता अॅप्रोच उपक्रमा अंतर्गत दोन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये सातत्याने एकत्रित उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये विचारांची आदान प्रदान केली जाते याचबरोबर रक्षाबंधनानिमित्त जिल्हा परिषद शाळा आणि अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित राख्या बनवल्या असून यामुळे बहीण भावाच्या नात्यातील बंध या चिमुकल्या मी अधिक दृढ केला आहे.

अंभोरे, पिंपरणे ,देवगाव, जाखुरी येथील वस्ती शाळा येथे अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या चिमुकल्याने तेथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत दिवसभर खेळत बागडत एकत्रित अभ्यास केला याचबरोबर क्राफ्ट कले अंतर्गत विद्यार्थ्यांनी सर्व ठिकाणी राख्या बनवल्या.

भारतामध्ये विविध संस्कृती, विविध परंपरा असून महाराष्ट्रात आणि देशात असलेल्या वेगवेगळ्या सणांपैकी बहिण भावाचे नाते दृढ करणाऱ्या रक्षाबंधनानिमित्त अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या चिमुकल्यांनी बहिण भावांसाठी हातांनी राख्या बनवल्या आहेत. हेच प्रशिक्षण ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना मिळाल्याने सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले

या अप्रोच उपक्रमासाठी गटविकास अधिकारी बाळासाहेब गुंड शिक्षिका सीमा गडाख सर्व केंद्रप्रमुख शिक्षक यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

या सर्व बालकांचे माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ शरयू ताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे ,डॉ. जे बी गुरव, प्राचार्य आशिष कुमार, श्रीमती शोभा हजारे यांनी अभिनंदन केले आहे.
Post Views: 578
