संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील असणाऱ्या उंबरी बाळापूर येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक निवड प्रक्रियेत अध्यक्षपदी नामदेव महादू भुसाळ आणि उपाध्यक्षपदी शिवाजी दारकू शिखरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
जलसंपदामंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील आणि युवकांचे प्रेरणास्थान डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकमुखाने निवडी झाल्या. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांसह मावळते अध्यक्ष नितीन उंबरकर व उपाध्यक्ष सुभाष जुंधारे यांचाही सत्कार करण्यात आला. सर्व संचालक व सभासदांचा विश्वास जपण्यासाठी आणि सोसायटीच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे कार्य करीन. शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी प्रयत्नशील राहीन, असे नूतन अध्यक्ष नामदेव पाटील भुसाळ यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील , डॉ सुजय विखे पाटील , जेष्ठ रामभाऊ पा. भुसाळ. रगनाथ पा ऊबरकर. शिवाजी पा. भुसाळ. भागवत पा ऊबरकर. पोपटराव पा. ऊबरकर भिकाजी पा खेमनर. दत्तात्रय पा भुसाळ , गणेश भूसाळ आदीसह युवकांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
तर उपाध्यक्ष शिवाजी शिखरे यांनीही विकासाभिमुख कारभाराचे आश्वासन देत सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. नव्या नेतृत्वाकडून विकासाची अपेक्षा सभासदांनी व्यक्त केली आहे.