भाजपच्या माघारीनंतर अपक्ष उमेदवार छाया शिंदे बिनविरोध विजयी !

शिर्डी । झुंझार न्यूज 

शिर्डी नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ (ब) मध्ये अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या. अर्ज माघारीच्या दिवशी भाजपसह इतर प्रमुख उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने अपक्ष उमेदवार श्रीमती छाया पोपट शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. विशेष म्हणजे युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

नेमके काय घडले?

प्रभाग क्रमांक ८ (ब) मध्ये चुरशीची लढत होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, निवडणुकीचे चित्र आज पूर्णपणे पालटले. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली विरोधी उमेदवारांशी चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर भाजपच्या अधिकृत उमेदवार आणि इतर अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याचा निर्णय घेतला.

छाया शिंदे यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या खालील उमेदवारांनी माघारीच्या दिवशी आपले अर्ज मागे घेतले:
१. मनीषा शिवाजी गोंदकर (भाजपा)
२. आमिना दिलदार सय्यद
३. रश्मी रमेश कोते
४. गिता सोमनाथ कावळे

भाजपच्या उमेदवार मनीषा गोंदकर यांनी माघार घेतल्याने ही निवडणूक एकतर्फी ठरली. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दाखवलेली राजकीय मुत्सद्देगिरी आणि त्यांनी घडवून आणलेल्या समन्वयामुळे छाया पोपट शिंदे यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला.

 

यावेळी डॉ सुजय विखे पाटील म्हणाले की , शिर्डी नगर परिषदेच्या प्रभाग ८ मध्ये भाजपाचे अधिकृत उमेदवार व जुने सहकारी यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने मोठा पेच उभा राहिला मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेवरुन निर्माण झालेला पेच सुटल्याने विष पसरविण्याना हा धडा असून याबाबत मी कुठलाही कुणावर ही दबाव टाकला नाही . हा एक नवा पर्याय निर्माण झाला असल्याचे डॉ विखे पाटील म्हणाले .

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी इतर उमेदवारांचे अर्ज मागे घेतल्याची खातरजमा केल्यानंतर छाया पोपट शिंदे यांना बिनविरोध विजयी घोषित केले. या विजयानंतर शिंदे समर्थकांनी जल्लोष केला असून, प्रभागातील विकासासाठी कटिबद्ध असल्याचे नवनिर्वाचित सदस्य छाया शिंदे यांनी सांगितले. 


डॉ. सुजय विखे पाटील यांच्या या रणनीतीची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *