माजी महसूलमंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीतून आणि नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात सहकार चळवळ अत्यंत भक्कम झाली आहे. पतसंस्था आणि दूध संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था समृद्ध करणारा हा ‘संगमनेर पॅटर्न’ राज्यासाठी आदर्श ठरला आहे. याच शृंखलेतील संगमनेर तालुक्यातील हंगेवाडी येथील ‘नेताजी सुभाषचंद्र बोस ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थे’च्या नूतन अद्यावत इमारतीचा भव्य लोकार्पण सोहळा मंगळवार, दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव सांगळे यांनी दिली आहे.
या सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे माजी महसूलमंत्री व लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे हे उपस्थित राहणार आहेत.
पारदर्शकता आणि शिस्तीचा वसा
याबाबत अधिक माहिती देताना गणपतराव सांगळे म्हणाले की, संगमनेर तालुक्यात सहकारातून खऱ्या अर्थाने समृद्धी निर्माण झाली आहे. बाळासाहेब थोरात यांनी दूध संस्था आणि पतसंस्था यांचे एकत्रीकरण करून ग्रामीण अर्थकारणाला बळ दिले आहे. हंगेवाडी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस पतसंस्थेने आपल्या स्थापनेपासूनच काटकसर, पारदर्शकता आणि आर्थिक शिस्त यांचे पालन केले आहे. संस्थेच्या निकोप कारभारामुळे हंगेवाडी व परिसरातील नागरिक, शेतकरी आणि व्यावसायिकांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. याच पारदर्शक कारभाराच्या जोरावर संस्थेने एक अत्याधुनिक व भव्य इमारत उभारली असून, तिचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
मान्यवरांची मांदियाळी
या सोहळ्यासाठी संगमनेर तालुक्यातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती असणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सत्यजित तांबे, बाजीराव पाटील खेमनर, सौ. दुर्गाताई तांबे, ॲड. माधवराव कानवडे, प्रतापराव ओहोळ, रणजितसिंह देशमुख, लक्ष्मणराव कुटे, इंद्रजीत भाऊ थोरात, शंकरराव खेमनर, युवा नेत्या डॉ. जयश्रीताई थोरात, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, हौशीराम सोनवणे, पांडुरंग पाटील घुले, रामहरी कातोरे, नानासाहेब शिंदे, राजेंद्र कडलक, राजेंद्र चकोर, अजय फटांगरे, सौ. अर्चना बालोडे , विक्रम राजे थोरात आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
सहकार चळवळीला बळ देणाऱ्या या कार्यक्रमासाठी हंगेवाडी व पंचक्रोशीतील सर्व नागरिक, शेतकरी बंधू, भगिनी आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नेताजी सुभाषचंद्र बोस पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन प्रतीक गणपतराव सांगळे आणि सर्व संचालक मंडळाने केले आहे