प्रवरानगर । झुंझार न्यूज

भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या ‘संविधान दिना’चे औचित्य साधून, प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्रीना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह उपस्थितांनी संविधानाच्या मूल्यांचे जतन आणि पालन करण्याची सामूहिक शपथ घेतली.

 

 

कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महामानवास विनम्र अभिवादन केले.

संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन व शपथग्रहण
अभिवादन सोहळ्यानंतर कार्यक्रमाचे गांभीर्य राखत संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी, तसेच लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी भारतीय संविधानातील मूल्यांचे काटेकोर पालन करण्याची शपथ सर्व अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांनी घेतली.

यावेळी बोलताना मंत्री राधाक ष्ण विखे पाटील म्हणाले की , डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या समानता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूलभूत तत्वांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करावे केवळ एका दिवसापुरते मर्यादित न राहता, कारखान्याच्या कामकाजात आणि दैनंदिन सामाजिक जीवनातही या संवैधानिक मूल्यांनुसार कार्य करण्याचा दृढ संकल्प करावा असे आवाहन करत  संविधानामुळेच देशातील सर्व घटकांना समान हक्क आणि संधी मिळत असल्याची भावना मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त झाली.

या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक मंडळ, कार्यकारी संचालक, विविध विभागांचे खातेप्रमुख, कामगार आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *