शिबलापूर । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात ‘भारतीय संविधान दिन’ मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून संविधानाप्रती आदर व्यक्त करण्यात आला.

 

देशाची लोकशाही, एकता आणि अखंडता अबाधित राखण्यासाठी संविधानाचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमा पूजनाने झाली.

या कार्यक्रमास गावचे सरपंच प्रमोद बोंद्रे, उपसरपंच सुनिल मुन्तोंडे आणि ग्रामसेवक सुरेंद्र बाम्हणे हे प्रमुख उपस्थित होते. तसेच माजी सरपंच दिलावर शेख, अण्णासाहेब पा. म्हस्के, प्रकाश शिंदे, बाळासाहेब पाबळ, नंदकुमार वालझाडे, शिवाजी आव्हाड, मधुकर मुन्तोंडे, नारायण बोंद्रे, शिवाजी डोंगरे, राजू सुखदेव नागरे, निवृत्ती नागरे, हौशीराम पाबळ, वसंत मुन्तोंडे, भाऊसाहेब मुंतोडे, सुभाष मुन्तोंडे, रमेश मुन्तोंडे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली.

तसेच आरपीआयचे (RPI) योगेश मुन्तोंडे, विशाल मुन्तोंडे आणि रवी मुन्तोंडे हे देखील उपस्थित होते. यासह भीमराज नागरे, लक्ष्मण गोडगे, राजेंद्र म्हस्के, विलास म्हस्के, छबन मुंतोडे, रोहिदास मुन्तोंडे, अनिल मुन्तोंडे, अजित म्हस्के, बौद्धाचर्या यमदास मुन्तोंडे, नितीन चव्हाण, शिवराम बोंद्रे, ज्ञानदेव नागरे, संजय म्हस्के, शिवाजी मुन्तोंडे, संदीप मुंतोडे, रघुनाथ जाधव, पंढरीनाथ नागरे, नवनाथ नागरे, अब्दुल करीम शेख, प्रदीप मैदड, पद्माकर पचारणे, कारभारी मांढरे, भाऊसाहेब मैडद, विक्रम नागरे, राहुल नागरे, सर्वेश नागरे, शिवाजी रक्ते, चेतन म्हस्के आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. उपस्थितांनी संविधानातील मूल्यांचे जतन करण्याचा संकल्प यावेळी केला.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *