संगमनेरकरांचा थोरात-तांबे परिवारावर अतूट विश्वास;

संगमनेर सेवा समिती’च्या सभांना शहरात उदंड प्रतिसाद

विकासाला साथ देण्याचा नागरिकांचा निर्धार

संगमनेर । झुंझार न्यूज 

संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरात आयोजित करण्यात आलेल्या कोपरा सभांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सभांमध्ये संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत उमेदवारांना आपला भक्कम पाठिंबा दर्शविला.

 

शहरातील विविध भागांत या कोपरा सभांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना थोरात म्हण संगमनेरकरांशी असलेल्या दशकानुदशकांच्या ऋणानुबंधांना उजाळा दिला. “आमच्या थोरात आणि तांबे परिवाराचे संगमनेरशी असलेले नाते हे केवळ राजकारणापुरते मर्यादित नाही, तर ते सेवाभाव, माणुसकी आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या सातत्यपूर्ण योगदानातून तयार झालेले आहे,” अशी भावना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली .

उपस्थित जनसमुदायाचा उत्साह पाहता, नागरिकांचा विकासकामांवर असलेला अढळ विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला. केवळ घोषणांवर नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून शहराचा कायापालट करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार संगमनेरकरांनी या वेळी व्यक्त केला. सभेदरम्यान नागरिकांकडून मिळणारे प्रेम, शुभेच्छा आणि आशीर्वाद हेच आमच्या कामाची पोचपावती असल्याची भावना थोरात-तांबे यांनी व्यक्त केली.


‘संगमनेर सेवा समिती’च्या माध्यमातून शहराच्या विकासाची घोडदौड अशीच अविरत सुरू ठेवण्यासाठी मतदारांनी समितीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले. या प्रचार सभांना मिळालेली गर्दी आणि उत्स्फूर्त प्रतिसाद हा थोरात-तांबे यांच्या नेतृत्वावर असलेल्या जनसामान्यांच्या विश्वासाची आणि प्रेमाची जिवंत साक्ष ठरली आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *