{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

शहरी निवडणुकांनंतर आता ग्रामीण भागाचे राजकारण तापले

‘ओबीसी महिला’ आरक्षणामुळे राजकीय गणिते बदलली

हिंगे दाम्पत्याच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष व चिंतेची बाब !

संगमनेर । झुंझार न्यूज

शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकीय धामधुमीनंतर आता जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणाचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. ग्रामीण विकासाचा कणा मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकते. या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शिर्डी विधानसभा मतदारसंघ आणि संगमनेर तालुक्याच्या राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘आश्वी जिल्हा परिषद गट’ सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. येथे राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात या दोन दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

 

आरक्षणाने बदलली गणिते, कुणबी फॅक्टर ठरणार निर्णायक

आश्वी जिल्हा परिषद गट हा भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र, यंदाच्या सोडतीत हा गट ‘ओबीसी महिला’ प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने अनेक दिग्गजांचे मनसुबे उधळले गेले आहेत. परिणामी, दोन्ही गटांकडून नवीन समीकरणांची जुळवाजुळव वेगाने सुरू झाली आहे. या गटात मराठा, वंजारी, दलित, धनगर आणि माळी समाजाचे प्राबल्य असले तरी, ओबीसी आरक्षणामुळे येथील कुणबी समाजाचा टक्का विजयासाठी निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे या लढतीत कुणबी समाजातील महिला उमेदवारालाच संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

थोरात गटाकडून हिंगे यांचे नाव आघाडीवर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या गटातून थोरात गटाकडून सौ. अरुणा विजय हिंगे यांचे नाव आघाडीवर आहे. आश्वी ग्रामपंचायतीवर ४० वर्षांची एकहाती सत्ता उलथवून लावत विजय हिंगे यांनी वर्चस्व प्रस्थापित केले होते. गेल्या सात वर्षांतील विकासकामे आणि विशेषतः आश्वी येथील भव्य राम मंदिराच्या उभारणीमुळे हिंगे दाम्पत्याची लोकप्रियता शिगेला पोहोचली आहे. या कामाच्या जोरावर सौ. अरुणा हिंगे यांचे नाव उमेदवारीसाठी निश्चित मानले जात आहे. याव्यतिरिक्त राजहंस दूध संघाचे व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर यांच्या कुटुंबातील व्यक्ती, सौ. वैशाली दत्तात्रय तांबे आणि सौ. रुपाली राहुल जऱ्हाड यांचीही नावे शर्यतीत आहेत.

विखे गटाची जोरदार मोर्चेबांधणी

दुसरीकडे, राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटानेही हा गड जिंकण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. विखे गटाकडून सौ. सोनाली मोहित गायकवाड, पिंप्री लौकीच्या सरपंच सौ. संगिता भारत गीते, सौ. सुजाता थेटे यांची नावे चर्चेत आहेत. तसेच, माजी जिल्हाधिकारी जोंधळे यांच्या कुटुंबातील महिलेला उमेदवारी देण्याबाबत चाचपणी सुरू असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे महायुतीचा भाग असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून माजी पंचायत समिती सदस्य सरुनाथ उंबरकर हे आपल्या पत्नी सौ. सविता उंबरकर यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असून त्यांनी तसे प्रयत्न सुरू केले आहेत.

पंचायत समिती गणांतही इच्छुकांची ‘भाऊगर्दी’

जिल्हा परिषदेसोबतच आश्वी बुद्रुक आणि आश्वी खुर्द या दोन्ही पंचायत समिती गणांमध्येही इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. हे दोन्ही गण ‘सर्वसाधारण महिला’ प्रवर्गासाठी राखीव झाल्याने चुरस वाढली आहे.

आश्वी बुद्रुक गण: येथे विखे गटाकडून जोंधळे आणि सौ. सुजाता थेटे तर थोरात गटाकडून सौ. आरती विवेक तांबे आणि रंजना नवनाथ आंधळे यांच्या नावाची चर्चा आहे. विशेष म्हणजे थोरात गटाचे माजी सरपंच महेश गायकवाड हे या गणातून दलितांना संधी मिळावी, या भूमिकेवर ठाम आहेत.

आश्वी खुर्द गण: या गणात इच्छुकांची मोठी भाऊगर्दी पाहायला मिळत आहे. विखे गटाकडून सरपंच सौ. संगिता गीते, सौ. विद्या गीते, सुरेश नागरे यांच्या पत्नी, शिबलापूरचे उपसरपंच सुनील मुन्तोडे यांच्या पत्नी आणि दाढ खुर्दचे सरपंच सतीश जोशी यांच्या पत्नी शर्यतीत आहेत. तर थोरात गटाकडून सौ. नेहा प्रमोद बोंद्रे, सौ. मनीषा संजय सांगळे, सौ. शोभा दिलीप नागरे आणि सौ. शितल उगलमुगले यांची नावे चर्चेत आहेत. शिबलापूरचे उपसरपंच सुनील मुन्तोडे हे दलित उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत.

 

स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी आपापल्या परीने तयारी सुरू केली असली तरी, अंतिम निर्णय हा राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्याच हाती असणार आहे. त्यामुळे तिकीट कोणाला मिळते आणि कोणाचा पत्ता कट होतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

हिंगे दाम्पत्याची ‘अर्थपूर्ण’ शांतता थोरात गटाच्या चिंतेत!

आश्वी जिल्हा परिषद गटात विकासाच्या जोरावर सौ. अरुणा विजय हिंगे यांचे नाव सर्वाधिक आघाडीवर आहे. राम मंदिराच्या उभारणीमुळे आणि गावाचा चेहरामोहरा बदलल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. मात्र, इतकी प्रबळ दावेदारी असतानाही पती विजय हिंगे आणि अरुणा हिंगे यांच्याकडून सध्या बाळगण्यात आलेली गूढ शांतता थोरात गटाची धाकधूक वाढवणारी ठरली आहे. ही शांतता राजकीय रणनीतीचा भाग आहे की आगामी काळात काही वेगळ्या घडामोडींचे संकेत, याची खमंग चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे

 

.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *