प्रभाग क्रमांक ११ मध्ये मतदारांचा प्रचंड प्रतिसाद

शिर्डी : झुंझार न्यूज

 

शिर्डी नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, महायुतीने प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाखाली शिर्डीत महायुतीचा झंझावाती प्रचार सुरू आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. जयश्रीताई विष्णू थोरात यांनी प्रचारात घेतली आघाडी असून प्रत्येक प्रभागातून त्यांना जनसामान्यांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे 

महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. जयश्रीताई थोरात यांनी ‘हायटेक’ प्रचारासोबतच मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर दिला आहे. त्या स्वतः घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत. केवळ मतांची याचना न करता, त्या प्रत्येक कुटुंबाची, वयोवृद्धांची अत्यंत आस्थेने विचारपूस करत आहेत. “शिर्डी शहराचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय असून, विकासाच्या या प्रवाहात आपण सर्वांनी यावे आणि महायुतीला भक्कम साथ द्यावी,” असे आवाहन सौ. थोरात करत आहेत.

 

शहरातील क्रमांक ११ प्रभागात सौ. जयश्रीताई थोरात यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या फेरीमध्ये हजारो महिला आणि तरुणांचा समुदाय उपस्थित होता. तरुणाईचा जोश आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे वातावरण पूर्णपणे महायुतीमय झाले होते. महायुतीच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेल्याचे दिसले .

ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांनी शिर्डी आणि परिसरात राबवलेल्या विकासकामांच्या जोरावर ही निवडणूक लढवली जात आहे. सौ. जयश्रीताई थोरात यांचा जनसंपर्क आणि विखे पाटील पिता-पुत्रांचे मार्गदर्शन यामुळे शिर्डी नगरपरिषदेत महायुतीची सत्ता येणार, असा विश्वास कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

 

प्रत्येक प्रभागातील मतदारांच्या गाठीभेटी घेत असताना सौ. थोरात यांना मिळणारा प्रतिसाद हा विजयाची नांदी असल्याचे लोकामधून बोलले जात आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *