शिर्डी : झुंझार न्यूज

शिर्डी नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीसाठी अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी म्हणजे शहरातील मुस्लिम समाजाने भाजप व महायुतीच्या सर्व उमेदवारांना आपला जाहीर पाठिंबा दर्शविला असून, या निर्णयामुळे महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

 

 

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉ सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी शहराचा सर्वांगीण विकास आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी कार्यक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे सांगत, मुस्लिम बांधवांनी भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. “सबका साथ, सबका विकास” या भूमिकेवर विश्वास ठेवून हा पाठिंबा देण्यात आल्याचे समाजातील प्रमुखांनी स्पष्ट केले.

 

 

या प्रसंगी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. जयश्रीताई थोरात आणि भाजपा शहराध्यक्ष रवी गोंदकर यांच्यासह महायुतीतील नगरसेवकपदाचे उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. मुस्लिम समाजातील जेष्ठ नागरिक आणि तरुणांनी यावेळी उमेदवारांचे स्वागत केले.

 

 

यावेळी बोलताना सौ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, “मुस्लिम बांधवांनी दिलेला हा पाठिंबा आमच्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. हा केवळ राजकीय पाठिंबा नसून शहराच्या विकासाला दिलेली पसंती आहे. आम्ही सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन शहराचा कायापालट करण्यास कटिबद्ध आहोत.

 

 

भाजपा शहराध्यक्ष रवी गोंदकर यांनी मुस्लिम समाजाचे आभार मानले. ते म्हणाले, “विरोधकांनी पसरवलेल्या कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता, मुस्लिम समाजाने विकासाच्या बाजूने कौल दिला आहे. या पाठिंब्यामुळे आमचा विजय निश्चित झाला असून, शहराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

 

नगरपरिषद निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यावर मुस्लीम समाज्याच्या पाठिंब्यामुळे भाजप आणि महायुतीचा विजय सुकर झाल्याचे चित्र दिसून येत आहे

 

 

 असून, महायुतीचे पारडे जड झाल्याचे बोलले जात आहे.”
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *