संगमनेर

संगमनेर नगरपालिकेच्या राजकारणात आणि समाजकारणात सध्या एका उच्चशिक्षित आणि अभ्यासू नेतृत्वाची चर्चा जोमाने सुरू आहे, ते नाव म्हणजे डॉ. मैथिली सत्यजीत तांबे. महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार सत्यजीत तांबे यांच्या पत्नी असलेल्या डॉ. मैथिली तांबे यांनी केवळ कौटुंबिक वारसा न जपता, स्वतःच्या कर्तृत्वाने शिक्षण, व्यवस्थापन आणि समाजकारण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

हार्डवर्ड ते संगमनेर: एक प्रेरणादायी शैक्षणिक प्रवास

डॉ. मैथिली तांबे या मूळच्या सांगली जिल्ह्यातील खानापूर येथील असून त्यांचा जन्म चेन्नई येथे झाला. त्या व्यवसायाने दंतचिकित्सक (BDS) आहेत. मात्र, केवळ वैद्यकीय क्षेत्रापुरते मर्यादित न राहता त्यांनी सिम्बायोसिस इन्स्टिट्यूटमधून ‘एक्झिक्युटिव्ह एमबीए’ पूर्ण केले. विशेष म्हणजे, जगातील प्रतिष्ठित ‘हार्वर्ड बिझनेस स्कूल’ मधून त्यांनी ‘स्कूल मॅनेजमेंट अँड लीडरशिप’चे प्रमाणपत्र मिळवले आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि तमिळ अशा चार भाषांवर त्यांचे प्रभुत्व असल्याने त्या सर्वांशी सहज संवाद साधू शकतात.

कॉर्पोरेट अनुभव आणि प्रशासकीय कौशल्य

पुण्यातील ‘द अकॅडमी स्कूल’ (TAS) च्या सीईओ (CEO) म्हणून काम करताना डॉ. मैथिली यांनी आपल्या व्यवस्थापन कौशल्याची चुणूक दाखवली आहे. प्रणाली-आधारीत कामकाज, परफॉर्मन्स मॅनेजमेंट सिस्टम (PMS) आणि शिक्षक सक्षमीकरण यांसारख्या आधुनिक सुधारणा त्यांनी यशस्वीपणे राबवल्या. एक बिझनेस कन्सल्टंट आणि कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून त्यांनी आरोग्य, उद्योग आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील अनेक संस्थांना धोरणात्मक नियोजनाचे धडे दिले आहेत. हाच प्रगल्भ अनुभव आता त्या संगमनेरच्या विकासासाठी वापरण्यास सज्ज आहेत.


आय लव्ह संगमनेर’च्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी

डॉ. मैथिली तांबे या केवळ प्रशासकीय कामातच नव्हे, तर जमिनीवरच्या समाजकारणातही तितक्याच सक्रिय आहेत. ग्रामोदय ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे काम उभे केले आहे. “I Love Sangamner” या उपक्रमांतर्गत त्यांनी महिला आणि तरुणांसाठी विविध सकारात्मक कार्यक्रम राबवले आहेत. महिला बचत गटांशी त्यांनी सातत्याने संवाद साधून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या शांत आणि संयमी स्वभावामुळे महिला वर्गात त्यांच्याबद्दल मोठी आपुलकी पाहायला मिळते.

स्वच्छ आणि सुसज्ज संगमनेरचे ध्येय

संगमनेर शहराचा सर्वांगीण विकास, स्वच्छता आणि प्रत्येक नागरिकाला समान संधी उपलब्ध करून देणे हे डॉ. मैथिली तांबे यांचे मुख्य ध्येय आहे. शहराला आधुनिक सुविधांनी परिपूर्ण करणे, पारदर्शक कारभार आणि नागरिककेंद्रित नगरपालिका प्रशासन ही त्यांची दृष्टी आहे. त्यांच्या रूपाने संगमनेरला एक ‘व्हिजनरी’ आणि उच्चशिक्षित नेतृत्व लाभले असून, शहराच्या प्रगतीला यामुळे नवी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed