राहुरी तालुकास्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुळापूर केंद्र- सोनगाव शाळेच्या इयत्ता दुसरीतील कुमारी ईश्वरी अनिल सांगळे हिने हस्ताक्षर स्पर्धेत किलबिल गटात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.
तिने मिळवलेल्या यशाबद्दल तालुक्याचे अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक युवा नेते अक्षय दादा कर्डिले, सामाजिक कार्यकर्ते बलराज वसंतराव पाटील, गटशिक्षणाधिकारी श्री. मोहनीराज तुंबारे , शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती नंदा गवळी व केंद्रप्रमुख श्रीमती नीलिमा गायकवाड तसेच मुख्याध्यापक श्री संतोष वैष्णव , वर्गशिक्षिका श्रीमती योगिता दुबे . शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सतिष हारदे व सर्व सदस्य , सरपंच श्री दादासाहेब हारदे , उपसरपंच श्री.अंबादास हारदे,विविध सहकारी सोसायटी चेअरमन श्री.भिमराज हारदे, माजी पोलीस पाटील श्री. बाळकृष्ण हारदे, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष श्री शिवाजी हारदे , माधव हारदे, सेवा सोसायटी संचालक सुरेखा माधवराव हारदे, ग्रामपंचायत सदस्य तेजस्विनी हारदे ,श्री. बापूसाहेब हारदे, अक्षय दादा कर्डिले युवा मंच तुळापूर सदस्य शिवा हारदे , मनोज हारदे, अमोल हारदे,तसेच समस्त ग्रामस्थ तुळापूर यांनी ईश्वरीचे व तिला मार्गदर्शन करणारे शिक्षक व पालक या सर्वांचे अभिनंदन केले.
संपूर्ण राहुरी तालुक्यात तसेच तुळापूर- निंभेरे परिसरात तिच्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.