मिल्किंग व ब्युटी गाय स्पर्धा

पंजाब नंतर महाराष्ट्रात प्रथमच गाईंची स्पर्धा

संगमनेर । झुंझार न्यूज

 

.

महाराष्ट्राचे माजी कृषी व महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या कळस कृषी व डेअरी प्रदर्शनामध्ये राज्यस्तरीय संकरित गाय मिल्किंग व ब्युटी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून पंजाब नंतर महाराष्ट्रात प्रथमच या स्पर्धेचे आयोजन होणार असल्याने यावर्षीच्या प्रदर्शनातील हे मुख्य आकर्षण राहणार आहे.

Oplus_131072

वेल्हाळे परिसरात नाशिक पुणे हायवे लगत शानकारच्या पाठीमागे असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये 9 वे कळस कृषी व डेअरी प्रदर्शन 9 जानेवारी ते 13 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये होणार आहे.

Oplus_131072

40 एकर परिसरामध्ये असलेल्या या प्रदर्शनामध्ये एज्युकेशनल एक्सपो, मशिनरी एक्सपो, वुमन बिझनेस एक्सपो, याचबरोबर पाच एकर क्षेत्रामध्ये 69 पिकांचे 350 प्रकारचे प्लॉट उभारण्यात आले आहे यामध्ये गहू हरभरा मका कांदा टोमॅटो झेंडू कारले मेथी शेपू यासह विविध फळ पिकांचा समावेश आहे.

Oplus_131072

9 जानेवारी रोजी माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे ,आमदार सत्यजित तांबे, डॉ जयश्रीताई थोरात, सौ शरयू ताई देशमुख व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या भव्य कृषी व डेअरी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

Oplus_131072

या प्रदर्शनामध्ये महिलांना उद्योजकतेमध्ये जास्तीत जास्त संधी मिळावी याकरता विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे याचबरोबर महिला व शालेय विद्यार्थ्यांकरता मोफत सुविधा असणार आहे.

Oplus_131072

तरी या कृषी प्रदर्शनाचा जास्तीत जास्त नागरिक दूध उत्पादक महिला व युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अमृतवाहिनी शिक्षण संस्था,शिवछत्रपती प्रतिष्ठान, समन्वयक सागर वाकचौरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ राजेंद्र वाघ, प्रा जी.बी बाचकर व थोरात कृषी महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Oplus_131072

डेअरी प्रदर्शनात 200 विविध गाईंचा समावेश

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा दुधाचा तालुका म्हणून ओळखला जातो. दररोज सुमारे 9 लाख लिटर दूध उत्पादन तालुक्यात होत असून पशुधन मोठ्या प्रमाणात आहे. दूध व्यवसायाला प्रोत्साहन म्हणून डेअरी प्रदर्शनात संकरित गाईंची स्पर्धा होत असून एचएफ व जर्सी गाय यांच्यासाठी ड्युटी व बिल्किंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आली असून यामध्ये राज्यभरातून 200 विविध गाई सहभागी होणार आहेत.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *