पानोडी । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पानोडी (काळूबाई ओढा) येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री इच्छापूर्ती काळू आई देवीचा यात्रा उत्सव शनिवार, दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यंदा ‘जागरण-गोंधळ’ हे यात्रेचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.


शनिवारी सकाळी १० वाजता गणेशनगर येथील प्रसिद्ध ‘शिवशक्ती वाघे मंडळ’ यांचा जागरण-गोंधळाचा कार्यक्रम संपन्न होईल. विशेष म्हणजे, हे मंडळ राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित असून आपल्या दर्जेदार सादरीकरणासाठी आणि लोककलेसाठी महाराष्ट्रभर परिचित आहे. त्यांच्या या कार्यक्रमातून महाराष्ट्राची लोकसंस्कृती आणि देवीची महती उलगडली जाणार आहे.

 

इच्छापूर्ती काळू आई ही नवसाला पावणारी देवी म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. दरवर्षी या यात्रेसाठी पानोडीसह संगमनेर तालुका आणि अहमदनगर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावतात. यावर्षी देखील यात्रेची जय्यत तयारी सुरू असून मंदिर परिसरात भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तरी पानोडी आणि परिसरातील सर्व भाविकांनी, आबालवृद्धांनी या धार्मिक कार्यक्रमाचा आणि दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थ व यात्रा उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे .

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *