महायुती सरकार बद्दल महिलांमध्ये प्रचंड नाराजी

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

 

निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली. या योजनेसाठी राज्याचे माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयातून तालुक्यातील सुमारे 90 हजार महिलांचे लाडकी बहीण योजनांचे फॉर्म भरण्यात आले यानंतर या महिलांना त्याचा लाभही मिळाला .मात्र नुकत्याच सरकारने 17967 महिलांना या योजनेतून वगळल्याने महिलांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली असल्याच्या महिला काँग्रेसचे अध्यक्ष सौ.अर्चनाताई बालोडे यांनी म्हटले आहे

संगमनेर तालुका हा लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखालील विकसित तालुका म्हणून ओळखले जाते. विविध योजनांचा लाभ जनतेला मिळावा याकरता यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला जातो.

महायुती सरकारने 2024 मध्ये लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेत तालुक्यातील महिलांना लाभ मिळावा याकरता यशोधन कार्यालयातील यंत्रणेने रात्रंदिवस काम करून तालुक्यातील सुमारे 90 हजार महिलांना याचा लाभ मिळवून दिला. डिसेंबर 2025 पर्यंत महिलांना या योजनेचा लाभ मिळाला.


मात्र आता सरकारने विविध कारणे दाखवून या योजनेतील 17967 महिलांना वगळले आहे. याचबरोबर निवडणुकीपूर्वी महिलांना 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासनही हवेत विरले असून महिलांना मिळत असलेल्या रकमेतही कपात झाली आहे अनेक महिलांना सातत्याने हेलपाटे मारावे लागत आहे. केवायसी करून देखील सुद्धा महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही तर अनेक गरीब महिलांच्या नावापुढे सरकारी नोकरी असा शेरा पोर्टलवर येत आहे त्यामुळे पात्र व गरीब महिलांना या योजनेपासून दूर राहावे लागत आहे.


सरकारने फक्त निवडणुकीसाठी या घोषणा केल्या असून अनेक महिलांना वगळले जात असल्याने संगमनेर तालुक्यात मोठी नाराजी निर्माण झाली आहे.

महायुती सरकारने फसवले

निवडणुकीपूर्वी महिलांना 2100 रुपये देऊ असे आश्वासन सरकारने दिले होते ते पैसे तर दिलेच नाही परंतु आहे त्या योजनेतून आम्हाला वगळले आहे याचबरोबर आम्ही गरीब असून सुद्धा आमच्या नावापुढे सरकारी नोकरी असा शेरा येत आहे हा काय प्रकार आहे कळत नाही गरिबांना फसवण्याचा प्रकार असल्याची टीका मीना थोरात वडगाव पान येथील शेतकरी महिला यांनी केली आहे

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *