श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पाथरे बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर विद्यालयाची बुलंद तोफ कुमारी प्रियंका सिनारे हिस पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा स्पर्धेत ” कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मानवी जीवनाच्या विकासास पूरक ठरेल “…..या विषयावर राज्यस्तरीय स्पर्धेत कनिष्ठ गटात द्वितीय क्रमांक पटकविला असून तिला तिला स्मृतीचिन्ह , प्रमाणपत्र व 2100 रुपये पारितोषिक माननीय डॉ शांताराम लांडगे प्राचार्य जिजामाता कॉलेज यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले.
तिला साथ देणारी कु. रेणुका शिरसाट हिचेही अभिनंदन यावेळी संस्थेचे सहसचिव श्री भारत घोगरे पीव्हीपी कॉलेजचे प्राचार्य डॉ. दिघे सर प्रा. डॉ. शशिकांत शिंदे डॉ. राम पवार डॉ. शांताराम चौधरी विद्यालयाचे प्राचार्य श्री बारगुजे सर श्री को-हाळे सर उपस्थित होते.
तिच्या या यशाबद्दल माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य मा. ना. सौ शालिनीताई विखे पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अहिल्यानगर मा. खा. डॉ. सुजय दादा विखे पाटील संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील शिक्षण संचालिका सौ लीलावती सरोदे स्थानिक स्कूल कमिटीचे उपाध्यक्ष मा आबासाहेब पाटील घोलप सरपंच उमेश पाटील घोलप विद्यालयाचे प्राचार्य श्री बारगुजे पर्यवेक्षक श्री तांबे कनिष्ठ महाविद्यालयाचे इन्चार्ज डॉ. संदीप म्हस्के सर प्राथमिक चे मुख्याध्यापक श्री घुगे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर सेवक वृंद विद्यार्थी विद्यार्थिनी पालक यांनी अभिनंदन केले आहे