संगमनेर । झुंझार न्यूज
प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी कार्तिक अमोल गवांदे इयत्ता सहावी, अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल संगमनेर याने देशभक्तीची भावना व्यक्त करणारे सुंदर चित्र रेखाटून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या चित्रामध्ये भारताचा तिरंगा , अशोकचक्र , तसेच देशाच्या एकतेचे व स्वातंत्र्याचे प्रतिक प्रभावीपणे साकारण्यात आले आहे.

या चित्रातून बालमनात देशप्रेम , राष्ट्रीय एकात्मता आणि संविधानाचे महत्व अत्यंत कल्पकतेने मांडले आहे. शिक्षक , पालक आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी त्याच्या कलेचे कौतुक केले असून , लहान वयातच दाखवलेल्या सृजनशीलतेमुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

त्याच्या या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना दृढ होत असून कला व संस्कृतीला प्रोत्साहन मिळत आहे.
