सांस्कृतिक क्षेत्रातील चॅम्पियनशिप पटकावली

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आ. डॉ सुधीर तांबे आणि कार्यकारी विश्वस्त सौ शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी मॉडेल स्कूलने राष्ट्रीय स्तरावरील ग्लोबल थिएटर फेस्टिवल कटक ओडिसा येथे 2026 वर्षाची सांस्कृतिक क्षेत्रातील चॅम्पियनशिप मिळवली असून संस्थेच्या यशामध्ये एक मानाचा तुरा खोवला असल्याची माहिती प्राचार्य आशिष कुमार यांनी दिली आहे.

ग्लोबल थिएटर फेस्टिवल कटक ओडिसा येथे राष्ट्रीय स्तरावरील सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन झाले यामध्ये अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या 25 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत सांघिक नृत्य ,नाटक ,वादन, गायन  या विविध स्पर्धांमधून आपला सर्वोत्कृष्ट ठसा उमटवून 2026 या वर्षाची चॅम्पियनशिप मिळवली आहे.

यामध्ये उत्कृष्ट कलाकाराचा प्रथम पुरस्कार श्रीराज हिरे याला मिळाला. उत्कृष्ट दिग्दर्शन ,उत्कृष्ट संहिता ,उत्कृष्ट स्टेज व्यवस्था ,उत्कृष्ट वेशभूषा व कला सन्मान पुरस्कार शाळेचे शिक्षक प्रशांत त्रिभुवन यांना मिळाला. तर वादन कलेतील द्वितीय पुरस्कार बासरी वादक क्षितिज मुसळे याला मिळाला एकांकिका व समूह गायन स्पर्धेत अमृतवाहिनी मॉडेल स्कूल ला द्वितीय पुरस्कार मिळाला. तर तृतीय पुरस्कारांमध्ये अन्वी फटांगरे हिने एकपात्री सादरीकरण केले. तर काव्या कातोरे व समूहाने सामूहिक वृत्त्याचे तृतीय बक्षीस मिळवले. सामूहिक नृत्य स्पर्धेत श्राव्या शहाणे हिने तृतीय क्रमांक मिळवला तर अमृतवाहिनी मॉडेल स्कूल ला उत्कृष्ट शिस्तप्रिय संस्कृतिक संघ स्वच्छता प्रिय संघ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या सर्व विद्यार्थ्यांना कलाशिक्षक प्रशांत त्रिभुवन यांचे मार्गदर्शन लाभले.

सांस्कृतिक क्षेत्रातील विविध पुरस्कारा मिळून सर्व राज्यांमधून महाराष्ट्रातील अमृतवाहिनी मॉडेल स्कूल ला एकत्रित गुण देऊन सांघिक चॅम्पियनशिपने सन्मानित करण्यात आले.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे मार्गदर्शक माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे ,उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील गुंजाळ ,कार्यकारी विश्वस्त सौ शरयूताई देशमुख ,मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा व्ही बी धुमाळ डायरेक्टर अकॅडमीक डॉ जे बी गुरव ,प्राचार्य आशिष कुमार, यांच्यासह सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे

विद्यार्थ्यांची कामगिरी कौतुकास्पद

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील सर्व विभागांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य दिले जात आहे याचबरोबर विद्यार्थ्यांमधील विविध कलागुणांना वाव मिळावा याकरता विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. अमृतवाहिनी मॉडेल स्कूल ने राष्ट्रीय पातळीवर मिळवलेले यश हे संस्थेसाठी अभिमानास्पद असून सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत असल्याचे संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ शरयूताई देशमुख यांनी म्हटले आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed