पोखर्डी येथे रब्बी हंगाम मार्गदर्शनासाठी शेतकरी चर्चासत्र उत्साहात संपन्न

 

 

अहिल्यानगर । झुंझार न्यूज

 

 

अहिल्यानगर तालुक्यातील पोखर्डी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या डॉ. विखे पाटील कृषी महाविद्यालय, विळद घाट यांच्या वतीने ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम २०२५–२६ अंतर्गत शेतकरी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. सदर चर्चासत्र दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी संत तुकाराम महाराज विठ्ठल मंदिर, पोखर्डी (ता. व जि. अहिल्यानगर) येथे उत्साहात पार पडले.

 

या कार्यक्रमाचे अध्यक्षपद गावचे सरपंच मा. श्री. अंतू वारुळे यांनी भूषवले. प्रमुख व्याख्याते म्हणून मा. श्री. बाळासाहेब काकडे (उपकृषी अधिकारी, पाथर्डी), श्री. सतीश गोसावी (उपकृषी अधिकारी, जेऊर भाग–१), श्री. राजेंद्र कर्डिले (सहाय्यक कृषी अधिकारी, पोखर्डी), डॉ. ईश्वर घटुळ (सहाय्यक प्राध्यापक, कृषी महाविद्यालय, विळद घाट) तसेच कृषिमित्र श्री. सुनील कराळे उपस्थित होते.

 

कार्यक्रमास कृषी महाविद्यालयाचे कार्यक्रम समन्वयक प्रा. के. एस. दांगडे, तसेच गावातील प्रगतशील शेतकरी श्री. सुनील वारुळे, संतोष मगर, कराळे बाबासाहेब, कराळे देविदास, कराळे अजय, वाघ पोपट, ठोंबरे भानुदास, काकडे भानुदास यांच्यासह अनेक शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना उपकृषी अधिकारी मा. श्री. बाळासाहेब काकडे यांनी कांदा बीजोत्पादनाविषयी सखोल माहिती देत शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचे समाधान केले. सहाय्यक कृषी अधिकारी श्री. राजेंद्र कर्डिले यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. तर डॉ. ईश्वर घटुळ यांनी संत्रा फळबाग व्यवस्थापनावर सखोल मार्गदर्शन केले.

 

या कार्यक्रमासाठी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन, विळद घाट (अहिल्यानगर) चे संचालक (तांत्रिक) प्रा. सुनील कल्हापुरे तसेच कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सोमेश्वर राऊत यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. के. एस. दांगडे यांनी केले. सूत्रसंचालन कृषिदूत कु. दरंदले अभिजीत यांनी केले, तर आभार प्रदर्शन गावचे कृषी सहाय्यक श्री. राजेंद्र कर्डिले यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषिदूत कु. घुमरे प्रणव, कोते अजिंक्य, उदय शितोळे, ज्ञानेश्वर साठे, कपिल पाठक यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed