एमएसबीटीइ विंटर परीक्षेत बेसिक मॅथेमॅटिक्स मध्ये विद्यार्थ्यांचे मोठे यश


गणित विषयात अमृतवाहिनी पॉलिटेक्निक चा झेंडा

 



संगमनेर । झुंझार न्यूज 

 

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वासाठी वाव देणाऱ्या अमृतवाहिनी पॉलिटेक्निक मधील 18 विद्यार्थ्यांनी  एम एस बी टी ई च्या हिवाळी परीक्षेत गणित विषयात 100 पैकी 100 मार्क मिळवली असल्याची माहिती प्राचार्य प्रा. व्ही बी धुमाळ यांनी दिली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या एम एस बी टी विंटर परीक्षेत बेसिक मॅथेमॅटिक्स या विषयात 18 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी मार्क मिळवले यामध्ये मेकॅनिकल विभागातून रुद्र लांडे ,ओम मंडलिक ,अनिकेत खिलारी, तर इलेक्ट्रॉनिक सांड टेली कम्युनिकेशन विभागातून संस्कृती गुंजाळ ,विशाल सावंत आणि संस्कृती वाकचौरे या विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर टेक्नोलॉजी विभागातून स्नेहा दरंदले ,ओंकार घोडके ,वेदांत जाधव, आदित्य कुंडे ,अनुष्का लोहोकरे, प्रथमेश शेळके, श्वेता सोनवणे यांनी तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागातून श्वेता घुमरे, अभिषेक गोपाळे, वैभव पवार ,ओंकार शिंदे साक्षी वाळे यांनी यश मिळवले

या सर्व विद्यार्थ्यांना प्रा. जी.बी कुटे ,प्रा. ए जी शिंदे ,असणे बी बी, आर ए डेरे यांचे मार्गदर्शन लाभले .

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे कार्यकारी विश्वस्त सौ शरयू ताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य प्रा व्ही.बी धुमाळ, डॉ जे बी गुरव ,उपप्राचार्य जी.बी काळे ,प्रथम वर्ष समन्वयक प्रा जे के सातपुते यांनी अभिनंदन केले आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed