मुंबई : झुंजार न्यूज नुकत्याचं झालेल्या नागालँड मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दोन आमदार निवडून आल्याबद्दल डॉ.राजेंद्र गवई यांनी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रिय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांची बांद्रा येथील कार्यालयात भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. महाराष्ट्र राज्याबाहेरील असणार्या नागालँड रामदास आठवले यांच्या गटाच्या रिपब्लिकन पक्षांनी मोठी व चांगली कामगिरी करत विधानसभेच्या निवडणुकीत मोठे यश संपादन केले . रामदास आठवले यांनी संपूर्ण देशामध्ये कार्यकर्त्याच संच उभा केला असून त्यांनी आतापर्यत पक्ष वाढी करिता केलेल्या कामाला तोड नसून भविष्यात अशी त्यांच्या माध्यमातून पक्षाला यश मिळो हीच शुभेंच्छा ! डॉ राजेंद्र गवई यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना दिल्या .
