प्रवारा नदीचे रायते फाटा रस्त्यावर विद्युतीकरण,

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर मध्ये येणाऱ्या चारही बाजूंच्या रस्त्यांचे चौपदरीकरण सुशोभीकरण व विद्युतीकरणासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नामुळे प्रवरा नदी ते रायते फाटा या संगमनेर खुर्द रस्त्यावर विद्युतीकरणाचा लखलखाट झाला असून नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

संगमनेर खुर्द येथे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून रस्त्यावर झालेल्या विद्युतीकरणाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सरपंच सौ.श्वेता मंडलिक, माजी उपसरपंच गणेश साहेबराव शिंदे, उपसरपंच शैला दत्तू भारती ,ग्रामपंचायत सदस्य वैशाली  सुपेकर, दत्तात्रेय खुळे , लिलाबाई टपले, गुलाब फकीर शेख,  डॉ विनायक गुंजाळ, सौ पल्लवी शंकर गुंजाळ, काळू शिंदे, सौ. आशा अजित शिंदे ,सौ. स्वाती अशोक शिंदे ,किसान सातपुते, शिवनेरी दूध संस्थेचे चेअरमन सुभाष पा. गुंजाळ , महेश भास्कर गुंजाळ विश्वस्त कपालेश्वर देवस्थान खांडगाव प्रभाकर गुंजाळ, बिलाल भाई शेख  रमेश आनंदराव गुंजाळ,  रमेश  सुपेकर, भगवान दगडू गोफणे, तसेच परिसरातील नागरिक महिला भगिनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर शहरात येणाऱ्या चारही देशांच्या रस्त्याचे चौपदरीकरण व सुशोभीकरण केले या अंतर्गत इंजिनिअरिंग कॉलेजचे संगमनेर बस स्थानक हा हॅपी हायवे तयार केला असून, पश्चिमेकडील अकोले नाका ते नाशिक पुणे रोड व पूर्वेकडील दिल्ली नाका ते समनापुर आणि दक्षिणेकडील दिल्ली नाका ते रायते फाटा या रस्त्यांचे चौपदरीकरण व सुशोभीकरण करण्यात आले आहे.

प्रवरा नदी ते रायते फाटा या रस्त्याच्या विद्युतीकरणाकरता 7 फेब्रुवारी 2023 रोजी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना पत्र देऊन निधीची मागणी केली. यानंतर या कामासाठी 1 कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर केला याचबरोबर 6 मार्च 2024 रोजी या कामाची निविदा प्रसिद्ध झाली. त्यामधून हे काम पूर्ण झाले असून आता प्रवरा नदी ते रायते फाटा यादरम्यान संपूर्ण विद्युतीकरण झाले आहे. या कामी इंद्रजीत भाऊ थोरात व यशोधन कार्यालय यांनी सातत्याने पाठपुरावा केला. यामुळे संपूर्ण रस्त्यावर लखलाखात झाला आहे.

यावेळी बोलताना माजी उपसरपंच गणेश शिंदे म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील प्रत्येक गावच्या विकासासाठी निधी दिला आहे आपला तालुका आपले शहर सुंदर व्हावे याकरता सातत्याने प्रयत्न केला आहे. हा सर्व निधी त्यांच्या कार्यकाळात मंजूर झाला असून अनेक जण श्रेय घेण्याचा प्रयत्न करतील परंतु हे श्रेय खऱ्या अर्थाने लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे आहे.


यावेळी उपस्थित नागरिक व महिला यांनी लोकनेते बाळासाहेब थोरात जिंदाबाद अशा घोषणा देऊन आनंद साजरा केला.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed