संगमनेर । झुंझार न्यूज
संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ (राजहंस) चे संचालक आणि पानोडी गावचे उपसरपंच मा. श्री. विक्रमराजे थोरात यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने राजहंस दूध संघाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

या सोहळ्याप्रसंगी राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, व्हाईस चेअरमन राजेंद्र पा. चकोर, कार्यकारी संचालक डॉ. सूजित खिलारी, संतोष मांडेकर , रविंद्र रोहम , राजू खरात यांच्यासह दूध संघाचे विविध पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वारसा कर्तृत्वाचा आणि निष्ठेचा
विक्रमराजे थोरात यांना राजकारणाचे आणि समाजकारणाचे बाळकडू त्यांचे वडील स्व. शिवाजीराव थोरात यांच्याकडून मिळाले आहे. स्व. शिवाजीराव थोरात यांचे सहकार क्षेत्रात मोठे योगदान राहिले असून, त्यांनी सहकार महर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांशी आणि थोरात परिवाराशी नेहमीच प्रामाणिक राहून काम केले. तोच वारसा विक्रमराजे अत्यंत समर्थपणे पुढे नेत आहेत. जहागिरीचा वारसा लाभलेला असतानाही, कोणताही मोठेपणा न मिरवता सामान्य कार्यकर्त्यांशी आणि जनतेशी नाळ जोडून ठेवणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे.

मितभाषी आणि धडाडीचे नेतृत्व
विक्रमराजे थोरात हे अत्यंत मितभाषी, हसमुख आणि प्रखर विचार मांडणारे तरुण नेतृत्व आहेत. कमी वयात त्यांनी आपल्या कामाच्या जोरावर जनमानसात स्थान निर्माण केले आहे. पानोडी गावचे उपसरपंच म्हणून काम करताना त्यांनी गावाच्या विकासात मोलाची भर घातली आहे, तर राजहंस दूध संघाचे संचालक म्हणून ते सहकार क्षेत्रातील प्रश्नांची जाण ठेवून कार्यरत आहेत.
यावेळी बोलताना राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख म्हणाले की, “विक्रमराजे हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्व आहे. सर्वांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची वृत्ती कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्याचा आलेख असाच उंचावत राहो.

या सत्कार सोहळ्यावेळी उपस्थित मान्यवरांनी विक्रमराजे थोरात यांच्या भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या .

Post Views: 244

