ग्रामीण भागात वाचनचळवळची प्रभावीपणे रौप्य महोत्सवी वाटचाल
संगमनेर । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला येथील कै अरुण साहेबराव कवडे सार्वजनिक वाचनालयास साहित्य कला मंच या संस्थेच्या वतीने आदर्श सार्वजनिक वाचनालय पुरस्कार संगमनेर नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे व सुप्रसिद्ध कवी शशिकांत शिंदे यांच्या हस्ते मिळाला आहे.
वाचनालयाचे प्रतिनिधी म्हणून गाव तिथे वाचनालय निर्माण व्हावे यासाठी सातत्याने अनेक वर्षापासून वाचनालय चळवळीसाठी काम करणारे तसेच कै अरुण साहेबराव कवडे सार्वजनिक नांदुरी दुमाला, वाचनालयाचे संस्थापक प्रमुख व राजहंस दूध संघाचे संचालक विलास कवडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा सुनीता घुले, कार्याध्यक्ष संजय नवले सर, डी एम लांडगे, जेष्ठ विधितज्ज्ञ अँड सुभाषराव गोडगे सर, अँड प्रदिप मालपाणी, कवी रमेश शिंदे, कवी डॉ विवेक वाकचौरे, नाना गुजराथी, अनिल देशपांडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला येथे या संस्थेची स्थापना 2000 साली झालेल्या कै अरुण साहेबराव कवडे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने व जयहिंद वाचन चळवळ गेली सव्वीस वर्षे प्रभावीपणे राबवली जात आहे. ग्रामीण भागात विद्यार्थी ,युवक ,ज्येष्ठ नागरिक यांना 17 वृतपत्रे मराठी, हिंदी,इंग्रजी या भाषेतील तसेच ,साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, दररोज सकाळी वाचकांना उपलब्ध आहेत.त्याचप्रमाणे वाचनालयामध्ये विविध काव्यसंग्रह,कथासंग्रह, कादंबरी ,चरित्र ,आत्मचरित्र तसेच विविध ग्रंथसंपदा मनोरंजन आणि ज्ञान संवर्धनासाठी सुसज्जपणे उपलब्ध करून देण्यात आली आहे .स्पर्धा परीक्षा तयारीसाठी युवकांना मार्गदर्शक असे संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत.बालवाचनालय, महिला वाचनालय, स्पर्धा परीक्षांसाठी ग्रंथसंपदा विभाग असे कक्ष वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. वाचनालयाच्यावतीने नेहमीच दर्जेदार पुस्तके अधिकाधिक लोकांपर्यंत या संस्थेच्या माध्यमातून ज्ञानदानाचे कार्य पोहचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
वाचन चळवळ ही गावातील तरुण पिढीची भाग्यरेषा असून यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहे. उत्कृष्ट वाचनालय पुरस्कार समितीच्या सदस्यांनी वाचनालयातील सर्व मार्गदर्शक वाटचालीच्या उपक्रमाची दखल घेऊन पुरस्कारासाठी निवड केली.
या पुरस्काराबद्दल राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे ,नाशिक पदवीधर विभागाचे आमदार सत्यजित तांबे , ग्रंथालय विभागाचे संचालक अशोकराव गाडेकर , रमेश शिंदे,राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख , जयहिंद चळवळ अध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे , एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ जयश्रीताई थोरात, वाचनालयाचे मार्गदर्शक साहेबराव कवडे, आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी वाचनालयाचे पदाधिकारी, सभासद ,वाचक वर्ग यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत.




