संगमनेर । झुंझार न्यूज

 

काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते तथा मा.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेची कामधेनू असणाऱ्या अमृतवाहिनी बँकेने 1100 कोटींचा टप्पा गार केला असून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील महिला भगिनींचे शून्य बॅलन्स वर खाते उघडण्यात येणार असून एटीएम वर दोन लाखांचा विमा दिला जाणार आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित एकविरा फाउंडेशनच्या क्रिकेट स्पर्धेत अमृतवाहिनी बँकेने महिलांसाठी ही विशेष योजना सुरू केली आहे. यावेळी मा.शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे,सौ.दुर्गाताई तांबे, बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, नगराध्यक्ष डॉ.मैथिलीताई तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात, व्हाईस चेअरमन नानासाहेब शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, मा.जि.प.सदस्य रामहरी कातोरे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे महिलांसाठी क्रिकेट रस्सीखेच व बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आला असून या स्पर्धांमधून 4500 महिला व युवतीने सहभाग घेतला आहे.

तालुक्यातील महिला व युवतीने विविध क्षेत्रात मोठी प्रगती केली असून हे सर्वांसाठी अभिमानास्पद असल्याचे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले असून महिला दिनाच्या निमित्ताने अमृतवाहिनी बँकेच्या वतीने शून्य बॅलन्स वर महिलांचे खाते उघडण्यात येणार असून एटीएम वर दोन लाखांचा विमा असणार आहे. यासाठी प्रत्येक महिलेने आपले आधार कार्ड, पॅन कार्ड व दोन फोटो घेऊन एकविराच्या सुरू असलेल्या क्रीडा महोत्सवात स्टेडियम मध्ये उभारण्यात आलेल्या अमृतवाहिनी बँकेच्या स्टॉलमध्ये जमा करावे व बँकेचे खाते खोलावे असे आवाहन बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी यांनी केले आहे.

यामुळे अनेक महिला भगिनींना शून्य दरामध्ये आपले खाते खोलता येणार असून एटीएम वर दोन लाखांच्या विम्याचा लाभ मिळणार आहे तरी या उपक्रमाचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन एकविरा फाउंडेशन व सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या वतीने करण्यात आली आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *