राहुरी । झुंझार न्यूज
स्वातंत्र्यसैनिक गोपीनाथ वाघमारे बहुउद्देशीय संस्था (खळी, ता. संगमनेर) आणि झुंजार बहुजन पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी येथे गुरुवारी (दि. १२ मार्च २०२६) भव्य पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सकाळी ११ वाजता नगर-मनमाड रोडवरील न्यायालय जवळील ‘हॉटेल आत्मा मालिक’ येथे पार पडणार असल्याची माहिती संघाचे सचिव राजेश गायकवाड यांनी दिली आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉ. राजेंद्र गवई यांच्या शुभहस्ते होणार असून, जिल्हाध्यक्ष सुधाकरराव रोहम यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिटीलाईन न्यूज व दैनिक भूगोलचे संपादक महेश भोसले भूषवणार आहेत.
या सोहळ्यामध्ये राहुरी तालुक्यासह संगमनेर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर या महत्त्वाच्या तालुक्यांतील पत्रकारांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. सन्मानचिन्ह म्हणून शाल, पेन, डायरी आणि प्रशस्तीपत्रक देऊन पत्रकारांना गौरविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे व पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर वाघमारे यांनी दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ पत्रकार व ‘प्रहार’चे राहुरी तालुका प्रमुख बाळकृष्ण भोसले हे राहुरी तालुक्याच्या वतीने सर्व पाहुण्यांचे व पत्रकारांचे स्वागत करतील. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दैनिक ‘पुण्यनगरी’चे कोपरगाव येथील झुंजार पत्रकार सिद्धार्थ मेहेरखांब करणार आहेत.

या सोहळ्यासाठी झुंजार पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विनोद साळवे, खजिनदार रावसाहेब पाटील काळे, कोषाध्यक्ष श्री. लोंढे, सदस्य संजय पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले असून, या कार्यक्रमासाठी पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Post Views: 536

