संगमनेर । झुंझार न्यूज

 

 

चिखली गावचे ज्येष्ठ व अभ्यासू राजकीय व्यक्तिमत्त्व, लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे एकनिष्ठ सहकारी तथा संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे विद्यमान संचालक भास्करराव मारुती सिनारे पाटील (वय – ६६) यांचे नुकतेच निधन झाले.

 

अत्यंत मनमिळावू स्वभाव असलेले भास्करराव सिनारे हे सातत्याने समाजकार्यात पुढे होते. लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक असलेले भास्करराव सिनारे यांनी दहा वर्षे गावचे सरपंच पद सांभाळले याचबरोबर छत्रपती दूध संस्थेचे अनेक वर्षे चेअरमन होते. महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघात 2008 पासून ते संचालक म्हणून अत्यंत कार्यक्षमपणे कार्यभार सांभाळत होते. त्यांच्या अकस्मात निधनाने चिखलीसह संगमनेरच्या सहकार क्षेत्रात मोठी हळहळ निर्माण झाली आहे त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

 

भास्करराव सिनारे यांच्या दुःखद निधनाबद्दल काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मा आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर, पांडुरंग पाटील घुले, रामहरी कातोरे, डॉ जयश्रीताई थोरात, इंद्रजीत भाऊ थोरात, सौ दुर्गाताई तांबे, ॲड माधवराव कानवडे,कारखान्याचे संचालक विनोद हासे, यांच्यासह विविध मान्यवर व दूध संघाचे सर्व संचालक अधिकारी व कर्मचारी यांनी शोक व्यक्त केला आहे.

 

भास्करराव सिनारे यांच्या निधनाने लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक हरपले असल्याची भावना चिखली व पश्चिम भागातील गावांमधून व्यक्त होत आहे.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *