शिर्डीकरांच्या प्रेमाखातर मी पुन्हा लोकसभा निवडणुक लढवणार ! म्हणताच ‘ महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व केद्रींय मंत्री रामदास आठवले झालेली भेटीतून तर्कवितर्क !                                                                                                 संगमनेर : झुंजार न्यूज                                                                                      शिर्डी लोकसभा मतदारसंघातून २००९ साली रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे पराभूत झाले होते. मात्र राजकिय वातावरणात बदल झाल्याने त्यांना पुन्हा शिर्डी लोकसभेचे वेध लागले असून पुन्हा लोकसभा लढण्याची इच्छा त्यांनी रविवारी शिर्डी येथील पत्रकार परिषदेत व रिपब्लिकन राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बोलून दाखवली . मात्र याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी , केद्रींय गृहमंत्री अमित शहा , जी पी नड्डा , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याचे म्हणताचं एक तासाने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट झाली हा योगायोग म्हणावे लागेल , १५ मिनिटाच्या गुप्त चर्चा मधून तपशिल समजला नाही मात्र दोन्ही नेत्याच्या चेहर्‍यावरील हस्यावरुन कदाचित दोन्ही नेत्यांनी आमचे आता ठरलेचा तर्कवितर्क काढला जात आहे .

                                                                          शिर्डी येथे होणार्‍या २७ मे व २८ मे २०२३ रोजी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन होणार असल्याने त्याच्या पुर्व तयारीकरिता रविवारी रिपब्लिकन पक्षाच्या राज्य कार्यकारणीची बैठक आयोजित केली होती या बैठकीकरिता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना . रामदास आठवले सकाळी ११ वाजता शिर्डीत आले होते . विश्रामगृह येथे सकाळी १२ वाजता पत्रकार परिषदेत घेवून राहुल गांधी , शरदराव पवार , उद्धव ठाकरे , राज ठाकरे , प्रकाश आंबेडकर यांच्या समाचार घेत विविध विषयांवर चर्चा करत ‘ संधी मिळाल्यास व शिर्डीकरांच्या प्रेमाखातर मी पुन्हा लोकसभा निवडणुक लढवणार ‘ हा बॉम्ब टाकत याबाबत भाजपा श्रेष्ठी व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील निर्णय घेतील असं सांगत निवडणुकीचा चेंडू त्याच्या कोर्टात टाकला .त्यांनतर शांती कमल येथील राज्य कारिणीच्या बैठकी सुद्धा कार्यकर्त्याचे मत जाणून घेतले . योगायोग म्हणजे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे सुद्धा शिर्डी व परिसरात होते . सायंकाळी ५ वाजता दोन्ही नेत्याची विश्रामगृहातील सह्याद्रीत भेट झाली . दोन्ही नेत्यांनी एकमेकाचा सत्कार करत एकमेकांची आपुलकीने खुशाली विचारली .एक तासा पुर्वी शिर्डीकरांच्या प्रेमाखातर निवडणुक लढविणार व त्याच्या निर्णय भाजपाच्या श्रेष्ठीसह राधाकृष्ण विखे पाटील निर्णय घेतील असल्याचे जाहिर केले होते . या दोन नेत्यांमधील झालेल्या भेटीमुळे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये एक आशेचा किरण जागून उत्साह संचारल्याचे दिसून आले .

                                                                                                                               आठवले – विखे पाटील या उभयाताच्या सह्याद्री कक्षातील १५ मिनिट्याच्या भेटीमध्ये तपशिल समजला नाही मात्र चेहर्‍यांवरांच्या हावभावात पुन्हा एकदा शिर्डीतून निवडणुक लढविणार असल्याच्या वक्तव्याला हिरवा कंदिल असल्याचे दिसून आले यावेळी विश्रामगृह व परिसरात जत्राचे स्वरुप दिसून आले

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *