शहरातील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचपीटी आर वाय के सपट कॉलेजच्या उपप्राचार्य पदी प्रा. प्रकाश निकम यांची निवड करण्यात आली आहे.प्रा. प्रकाश निकम यांनी बिटको कॉलेज नाशिक रोड येथे अध्यापनाचे काम केल्यानंतर त्यांची बीवायके आरवायके कॉलेज नाशिक येथे सेवा करत असताना संस्थेने त्यांना पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती दिली होती.या ठिकाणीही त्यांनी आपल्याअध्यापनाबरोबरच प्रशासकीय कामाचा ठसा उमटविला.पर्यवेक्षक पदी काम करत असताना संस्थेने त्यांच्या कामाची दखल घेत एचपीटी आरवायके कॉलेजच्या उपप्राचार्य पदी त्यांना पदोन्नती दिली.
अत्यंत शांत सर्वांना बरोबर घेऊन काम करून घेण्याची हातोटी,प्रामाणिक व शिस्तप्रिय प्रा. निकम यांची उपप्राचार्य पदी निवड झाल्याबद्दल संस्थेच्या सेक्रेटरी डॉ. दीप्ती देशपांडे,विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी,अधीक्षक गिरीश नातू ,वैभव सरोदे,कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही के अवस्थी, उपप्राचार्य डॉ. पी. एस. देशपांडे आदींसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रा निकम यांच्या निवडीबद्दलआनंद व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहे.